भुसावळ - Bhusawal - प्रतिनिधी :

एका महिलेची 60 लाख 70 हजार रुपयांची फसवणूक करुन धमकी दिल्याप्रकरणी माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी याबाबत काही महिन्यांपूर्वी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, ममता सुधाकर सनासे (रा. सद्गुरू हौसिंग सोसायटी पूजा कॉपलेस मागे) यांनी दिलेल्या फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे की, माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी त्यांच्या मालकीचे वेंकटेश कॉम्प्लेक्समधील गाळे विक्रीचे आमिष दाखवले व त्यांच्याकडून 60 लाख 70 हजार रुपये आरटीजीएसद्वारे घेऊन फसवणूक केली.

हा व्यवहार मागील वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झाला होता. त्यावेळी श्री. चौधरी हे रावेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवित होते.

गाळे खरेदी करण्यासाठी त्यावेळी गाळे मालक चौधरी व घेणारे सनांसे हे निबंधक कार्यालयात खरेदी करण्यासाठी गेले होते. मात्र तांत्रिक अडचणीमुळे उशीर होत असल्यामुळे त्यावेळी चौधरी यांना प्रचाराला जायचे असल्याचे कारण सांगून निघून गेले होते. तो पर्यंत त्यांनी सदर महिलेकडून पैसे घेऊन प्रचारार व्यस्त झाले होते.

यासंदर्भात सनांसे यांनी अपर पोलीस अधीक्षक व तत्कालीन डीवायएसपी राठोड यांच्याकडे तक्रार केली होती.

तक्रारीची संबंधित अधिकार्यांनी दखल न घेतल्यामुळे ममता सनान्से यांनी पुन्हा जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे 7 सप्टेंबर रोजी पत्र देऊन तक्रार केली होती.

याची दखल घेऊन पोलीस अधीक्षक मुंडे यांनी अर्जाची चौकशी करण्यासाठी आदेश दिले होते. त्यानंतर श्री. चौधरी यांनी 27 ऑक्टोबर रोजी जीवे मारण्याची धमकी दिली.

अशी फिर्याद ममता सनांसे यांनी बाजारपेठ पोलीसात दिली. यावरून बाजारपेठ पोलीसात चौधरीविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर आता चौधरींविरूद्ध भादवि कलम 420, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास भुसावळ बाजारपेठ पोलीस करत आहेत.