भुसावळ - Bhusawal - प्रतिनिधी :

मुंबईतील काशी मीरा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील संशयित महिलेला येथील पापा नगरातून कुब्रा मोहम्मद इराणी (रा. भिवंडी, मुंबई) या महिलेला अटक करण्यात आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेच्या पतीने हातचलाखीने दागिने लांबवले यानंतर हे दागिने पत्नीकडे सोपवल्याचा आरोप आहे.

मुंबईतील काशी मीरा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक जावेद मुल्ला यांनी येथील बाजारपेठ पोलिसांना संबंधित गुन्ह्याबाबत व आरोपी महिला येथील पापा नगरात आल्याची माहिती दिल्यानंतर सापळा रचण्यात आला.

नववर्षाच्या प्रारंभी एक रोजी आरोपी महिलेच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, पो.नि.दिलीप भागवत, एलसीबीचे पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पो. काँ. विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, ईश्वर भालेराव, महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रिया अरखराव तसेच एलसीबीचे कॉ. कमलाकर बागुल आदींनी महिला आरोपींच्या मुसक्या आवळल्या.