भुसावळ - Bhusawal - प्रतिनिधी :

येथील बाजारपेठ पोलिसांनी नुकतीच गुटखा विक्रेत्यावर कारवाई केली होती. त्यातील आरोपीने सदरचा गुटखा जळगावच्या व्यापार्याकडून आणल्याचे सांगितल्यानंतर सदर व्यापार्याच्या दुकानावर छापा मारुन गुटखा व लुना सह 79 हजार 187 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई येथील बाजारपेठ पोलिसांनी केली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बाजार पेठ पोलिसात गु.र.नं. 0979/2020 भादवी कलम 328, 272, 273, 188, अन्न व सुरक्षा मानले अधिनियम 2006 चे कलम 30(2)(र),26(2)(4),27(2)(श) प्रमाणे 23 रोजी पहाटे दाखल गुन्ह्यात आरोपी यासीन उर्फ आज्जु अन्वर शेख (रा. आवेश पार्क, डायमंड कॉलनी भुसावळ) यास पहटे 4.18 वा. सदर विमल गुटका विक्रीमध्ये अटक करण्यात आली होती.

आरोपीला न्यायालयाने पोलीस कोठडीही सुनावली आहे. कोठडीत त्याला विचारणा केली असता त्याने हा माल जळगाव येथुन आणल्या चे सांगितले होते.

त्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी 25 रोजी जळगाव शहरातील सिंधी कॉलनीतील जे.बी.ट्रेडर्स या दुकानातून गुटका विक्री करणारा मुख्य व्यापारी आरोपी गिरीष राजेलदास खानचंदानी (वय 40 रा. डी मार्ट जवळ आदर्श नगर जळगाव), जयेंद्र मनोहरलाल स्वामी (वय 26 रा.आदर्श नगर जळगाव), शेख शकील शेख मासूम (वय 41, रा.खंडेराव नगर जळगाव) यांना ताब्यात घेण्यात आले .

त्यांच्याकडुुन 72 हजार 187 रुपयांचा विमल गुटखा, सागर गुटखा, राज निवास गुटखा व 7 हजार रुपयांची एक लुना असा एकुण 79 हजार 187 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, पो. नि. दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि कृष्णा भोये, गणेश धुमाळ, अनिल मोरे, मंगेश गोटला, पो. काँ. विकास सातदिवे, रविंद्र तायडे, प्रशांत परदेशी, चेतन ढाकणे, ईश्वर भालेराव, सुभाष साबळे, प्रशांत सोनार, हे. कॉ. चालक अय्याज सैय्यद यांनी केली त्यांना जळगाव येथील सहा. फौ. आंनदसिंह पाटील, पो.कॉ. योगेश साबळे, तायडे यांनी मदत केली