फरार आरोपीस अटक

रेल्वे न्यायालयाने सुनावली होती शिक्षा
फरार आरोपीस अटक

भुसावळ - Bhusawa l-प्रतिनिधी :

येथील लोहमार्ग पोलिसात दाखल विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपीस न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतरही पसार झालेल्या आरोपीस लोहमार्ग पोलिसांनी अटक करुन न्यायालयात हजर केले.

येथील लोहमार्ग पोलिसात दाखल गु.र.नं. ८०/२०१२, भा.दं.वि. ३५४ प्रमाणे दाखल गुन्ह्यातील आरोपी योगेश मधुकर महाजन (वय ३०, रा. वाघोड)याला येथील रेल्वे न्यायालयाने एक वर्षाचा कारावास व एक हजार रुपयांच्या दंडाची रक्कम दंडाची शिक्षा सुनावली होती.

आरोपी हा अपील कालावधी नंतर कोर्टात हजर न होता पासार झाला होता. सदर आरोपीला कोर्टाच्या आदेशानुसार त्याच्या गावातून अटक करुन न्यायालयात हजर केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com