भुसावळ : जबरी चोरीचा डाव उधळला

तलवारीसह तिघे संशयीत जाळ्यात
भुसावळ : जबरी चोरीचा डाव उधळला

भुसावळ - Bhusawal - प्रतिनिधी :

जबरी चोरीच्या प्रयत्नात असलेल्या तिघांच्या टोळीला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून आरोपींच्या ताब्यातून तलवार, चेन व चाकू जप्त करण्यात आला आहे.

ताब्यात घेतलेल्या संशयीतांपैकी एक अल्पवयीन असून शहर पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

तापी पुलावर काही संशयीत जबरी चोरीच्या उद्देशाने आल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर शहरचे पो.नि. बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार मोहंमद अली सैयद, इकबाल अली सैयद, हे.काँ. सुपडा पाटील, कॉ. सचिन काटे यांनी धाव घेतली. पोलिसांना पाहताच संशयीत पळण्याच्या प्रयत्नात असतानाच त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

यावेळी शुभम शेखर पाटील (18), राज रामचरण गुप्ता (19, दोन्ही रा.अकलूद, ता.यावल) यांना अटक करण्यात आली तर अन्य एका अल्पवयीनास ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत हे तिन्ही जण चोरी करण्यासाठी भुसावळात येत असल्याचे सांगण्यात आले.

जाकीर हारून मन्सुरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com