दुकानाचा पत्रा वाकवून २० हजारांचा मुद्देमाल लांबविला
दुकानाचा उचकविण्यात आलेला पत्रा

दुकानाचा पत्रा वाकवून २० हजारांचा मुद्देमाल लांबविला

लॉकडाऊनचा चोरट्यांनी घेतला फायदा

भुसावळ - Bhusawal - प्रतिनिधी :

बंद किराणा दुकानाच्या मागील बाजुने पत्रा उचकवून दुकानात प्रवेश करुन अज्ञात चोरट्यांनी दुकानातील जवळपास २० हजार रुपयांचा किराणा सामान लांबविल्याची घटना दि.२१ रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, येथील वरणगाव रोडवरील पंधरा बंगला भागातील विजय दमाडे यांच्या अर्पिता बिग डिस्काउंट शॉप हे दुकान २० रोजी सकाळी ११ वाजता लॉकडाऊनच्या नियमांनुसार बंद करण्यात आले होते.

ते २१ रोजी सकाळी ७.३० वाजता उघडण्यात आले असता दुकानाच्या मागील बाजुस असलेल्या पत्रा अज्ञात चोरट्यांनी उचकवून दुकानात प्रवेश करुन दुकानातून जवळपास २० हजार रुपयांचा किरणा सामनाची चोरी करण्यात आल्याचे उघड झाले.

घटना लक्षात येताच बाजारपेठ पोलिसांना यााबत माहिती देण्यात आली. दरम्यान, दुपारी १२ वाजता पोलिस कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत दुकानाची पहाणी केली.

सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये परिसरात दिवस रात्र सन्नाटा रहात असल्यामुळे अज्ञात चोरट्यांनी या दुकानाला निशाना बनविल्याचे लक्षात येत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com