भुसावळात तरुणाचा खून, संशयित ताब्यात

महिनाभरात दुसरी घटना : अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट
भुसावळात तरुणाचा खून, संशयित ताब्यात

भुसावळ - Bhusawal - प्रतिनिधी :

शहरातील रेल्वे कॉलनी परिसरातील पोलीस चौकीच्या परिसरात एकाचा खून झाल्याची घटना 8 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने शहरात पुन्हा खळबळ उडाली.

शहरातील उत्तर रेल्वे भागातील आगवाली चाळ परिसरातील पंजाबी मशिदीच्या समोर शनिवार दि. 8 रोजी पत्र्यांच्या खाली एक मृतदेह आढळून आला.

खून झाल्याची चर्चा वार्‍यासारखी पसरताच परिसरातील नागरिकांनी याबाबतची माहिती शहर पोलीस स्थानकात दिली. यानुसार पोलीस कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी परिसरात चौकशी केली असता खून झालेल्या व्यक्तीचे नाव सुनील अरूण इंगळे (वय 35, रा. समतानगर रेल्वे दवाखाना मागे, भुसावळ) हा असल्याचे निष्पन्न झाले. खून रात्री बाराच्या सुमारास झाला.असून मयताच्या अंगावर धारदार हत्याराने वार करण्यात आलेले असून त्याला दगडाने ठेचण्यात आल्याचे दिसून येत आहे.

काही दिवसांपूर्वी याच रोडवर एका रिक्षावाल्याची सुद्धा दगडाने ठेचुन हत्या झाली होती. यानंतर पुन्हा एक खून आणि तो देखील पोलीस चौकीनजिक भागात झाल्याने खळबळ उडाली आहे.

दरम्यान, खुनाची माहिती मिळताच अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची माहिती जाणून घेतली. त्यांच्या सोबत डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, शहरचे पोनि बाळासाहेब ठोंबे व सहकारी सोबत होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com