भुसावळात मंदीरासह पाच दुकाने फोडली

लॉकडाऊनचा फटका : डिवायएसपींडून पाहणी
भुसावळात मंदीरासह पाच दुकाने फोडली

भुसावळ - Bhusawal - प्रतिनिधी :

शहरातील आठवडे बाजार भागात अज्ञात चोरट्यांनी 25 रोजी पहाटे 3.30 वाजेच्या सुमारास लॉकडाउन फायदा घेत पाच दुकाने फोडली असून ऐन लॉकडाऊनमध्ये चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. घटनेची माहिती मिळताच डिवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

अधिक माहिती अशी की, सध्या कोरोनामुळे 1 मे पर्यंत संचार बंदी लागू करण्यात आली आहे. प्रशासनाच्या आदेशावरून करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्य शासनाने अत्यावश्यक सेवा वगळता सकाळी 7 ते 11 यावेळेतच दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी दिली असल्याने सकाळी 11 वाजेनंतर दुकाने बंद झाल्याने शहरात शुकशुकाट पसरला असल्याचा फायदा चोरट्यांनी घेऊन 25 रोजी पहाटे 3.30 वाजेच्या सुमारास आठवडे बाजारातील कन्हैया लाल तलरेजा, शिव ट्रेडिंग, हनुमान मंदिरातील दानपेटी, अशोक श्यामलाल किराणा व मरीमाता मंदिरा जवळील तेलाचे दुकान असे दुकान फोडून काही दुकानातून चोरट्यांनी ऐवज लांबविा आहे.

घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, सपोनि अनिल मोरे, गणेश धुमाळ, संकेत झांबरे, अविनाश पाटील यांनी भेट देऊन दुकानांची पाहणी केली.

तसेच आठवडे बाजारातील डिस्को टॉवरच्या मालकाला बोलावून त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी करून त्या दिशेने पोलीस अधिकारी तपास करीत आहे.

डिवायएसपींची व्यापारी असोसिएशन सोबत बैठक-शहरातील आठवडे बाजारातील मंदिराचे कुलूप तोडल्याची घटना सकाळी निदर्शनास आली आहे.

त्याचप्रमाणे दोन किराणा दुकानांचे कुलूप तोडण्यात आले आहे. त्या दृष्टीने शहरातील मुख्य व्यापार्‍यांसोबत 25 रोजी चर्चा करण्यात आली. चोरी झालेल्या दुकानांमधील सीसीटीव्ही बंद असल्याचे निदर्शनास आले.

शहरातील सर्व दुकानदारांनी सीसीटीव्ही चालू ठेवावे शहरात काही प्रॉब्लेम असतील तसेच पेट्रोलिंग व रात्रीची पोलीस गस्त कशी वाढवता येईल तसेच व्यापारी असोसिएशनच्या व्यापार्‍यांकडून कशी मदत मिळेल याबाबत चर्चा केली.

त्यांच्याकडून देखील ज्या भागात सिसीटीव्ही नसेल त्या भागात बसवून घेणार आहे. तसेच पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांना पोलीस मित्र म्हणून सहकार्य करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. त्याप्रमाणे पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती डिवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com