तरुणाची दगडाने ठेचून हत्या

तरुणाची दगडाने ठेचून हत्या

भुसावळ - Bhusawal - प्रतिनिधी :

येथील लिंपस क्लब परिसरात एका 34 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून निर्घृणपणे खून केल्याची घटना दि. 13 रोजी मध्यरात्री घडली.

सर्वत्र गुढीपाडव्याचा सण साजरा होता असतांना खुनाची घटना उघडकीस आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील लिंम्पस क्लब चाळीस खोली भागांमध्ये तीस ते पस्तीस वर्षीय इसमाचा मृतदेह पडला असल्याची माहिती भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे पोनि बाबासाहेब ठोंबे यांना मिळाली.

त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता 35 वर्षीय युवकाचा डोक्यात दगड घालून किंवा तीक्ष्ण हत्याराने वार केल्यामुळे खून झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. यावेळी भुसावळचे डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, सहा.पोलिस अधिक्षक अर्चित चांडक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जळगाव येथून फॉरेन्सिक टीम व डॉग स्कॉडला पाचारण केलेे.

दुपारी उघडकीस आलेल्या या घटनेमुळे भुसावळ शहरात दहशीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान हा मृतदेह समतानगर मधील ध्यान केंद्राजवळील रहिवाशी संदीप गायकवाड (वय 34) यांचा असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, मयताची आई व पत्नी, लहान चिमुकलीने घटनास्थळी येताच हंबरडा फोडला. या प्रकरणी भुसावळ शहर पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांची टीम करत असल्याची माहिती जळगावचे अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी दिली आहे.

अप्पर पोलिस अधीक्षकांनी केली पाहणी - घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, शहर पोलीस स्टेशनचे पोनि बाबासाहेब ठोंबे, सपोनि संदीप गोसावी, सपोनि संदीप दुणगहू, संकेत झांबरे, ईश्वर भालेराव, विकास सातदिवे, कृष्णा देशमुख, बंटी कापडणे तसेच पोलिस कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com