गांजाची तस्करी करणार्‍यांना तिघांना पोलिस कोठडी

भुसावळ येथून सुरतला जात होता गांजा : बाजारपेठ पोलिसांची कारवाई
भुसावळ येथे गांजाची तस्करी करणाऱ्या वाहन व आरोपींसह पोलीस पथक
भुसावळ येथे गांजाची तस्करी करणाऱ्या वाहन व आरोपींसह पोलीस पथक

भुसावळ - Bhusawal - प्रतिनिधी :

शहरातून सुरतला गांज्याची तस्करी होत असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे बाजारपेठ पोलिसांनी सापळा रचून तीन संशयीतांना मुद्देमालासह ताब्यात घेतल्याची कारवाई  ३ रोजी पहाटे नाहाटा महाविद्यालयाजवळ करण्यात आली.

आरोपींच्या ताब्यातून सुमारे ८ लाख ४९ जिार ९१२ रुपये किंमतीचा गांजा व आठ लाख रुपयानची दोन वाहने असा एकुण १६ लाख ४९ हजार ९१२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या कावराईने परिसरार खळबळ उडाली आहे. दरम्यान या गुन्ह्यातील गांजा तस्करी करणारा मालक पसार असून त्याचा शोध सुरु आहे. शहरात गेल्या काही वर्षातील ही मोठी कारवाई झाल्याने पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळातून सुरत येथे गांजाची तस्करी करण्यात येत होती. याबाबत गुप्त माहितीच्या आधारे डिवायएसपी सोमनाथ वकचौरे, आपीएस अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलिसांच्या पथकाने नाहाटा महाविद्यालया जवळ, पाण्याच्या टाकीजवळ ३ रोजी पहाटे ३.४५ वाजेच्या सुमारास सापळा रचुन टेम्पो जी.जे.०५ बी.यु.०१७७ व जी.जे.०५ बी.टी.५१५५ या दोन्ही वाहनांवर पोलिस पथकाने छापा मारुन वाहन थांबविली.

यावेळी आरोपींची चौकशी केली असता उडवा उडवीची उत्तरे देण्यात आल्याने पोलिसांनी वाहनांची तपासणी सुरु केली. त्यात जवळपास ८ लाख ४९ हजार ९१२ रुपयांचा १४१ किलो गांजा आढळून आला.

यावेळी पथकाने गांजा, वाहनांसह आरोपी शब्बीर कालेखान पठाण (वय ४०, रा.अकबर की वाडी, खोलवड, ता. कामरीज, जि.सुरत), शेख अकील शेख लतीफ (वय ३४, रा. बापूनगर, झोपडपट्टी खोलवाडा, ता.कामरीज, जि.सुरत) व शेख शरीफ शेख (वय ३३, रा. मुस्लीम कॉलनी, उस्मानीया मशीदजवळ, भुसावळ) यास अटक करण्यात आली.

मुख्य आरोपी हमी समशोद्दीन पतंगवाला (रा. नवीन ईदगाहच्यामागे, भुसावळ) हा पसार झाला आहे. दरम्यान आरोपींनी गांजा तस्करीचा संशय न येण्यासाठी वाहनात मोठ्या प्रमाणावर टरबूज भरले होते. त्याखाली हा गांजा ठेवण्यात आला होता.

मात्र गोपनीय माहितीनुसार टरबूजाखाली गांजाची पाकिटे असल्याची माहिती असल्याने पोलिसांनी संपूर्ण टेम्पोची झडती घेतल्यानंतर त्यात प्लॉस्टीकच्या पिशवीत गांज्याची २८ पाकिटे आढळली. फॉरेन्सीक टीम व पंचांनी तपासणी केल्यानंतर गांजाचे वजन केले असता तो १४१.६५२ किलोग्रॅम भरला. याबाबत बाजारपेठ पोलिसात सहा.निरीक्षक गणेश धुमाळ यांच्या फिर्यादीनुसार चौघा आरोपींविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गु.र.नं. १४०/२१, एनडीपीएस अधिनियम १९८५ चे कलम २०, २९ नुसार चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, सहा.पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठचे सहा. निरीक्षक गणेश रामदास धुमाळ, सहा.निरीक्षक अनिल छबूराव मोरे, हवालदार जिजाबराव पाटील, अयाज अली, सुनील सोनवणे, रमण सुरळकर, समाधान पाटील, उमकांत पाटील, प्रशांत परदेशी, सुभाष साबळे, ईश्‍वर भालेराव, करतारसिंग पररेशी आदींच्या पथकाने केली. तपास सुनील सोनवणे, अनिल पाटील, किशोर महाजन करीत आहेत.

सदरच्या कावराईत सिंडीकेट आरोपी असण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने तसेच त्या आरोपींचा शहराशी कसा संबंध आहे.

या दृष्टीने तपास करण्यात येत असल्याची माहिती एएसपी आर्चित चांडक यांनी दिली. दरम्यान, गांजाची तस्करी उत्तर भारतातून होत असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com