भुसावळ - Bhusawal - प्रतिनिधी :

शहरातील लोणारी मंगलकार्यालयाजवळील मोकळ्या जागेत दरोडा टाकण्याच्या इराद्याने दबा धरुन बसलेल्यांचा पाठलाग करत असतांना पोलिसांच्या सामोर हवेत गोळी बार केल्याच्या घटनेतील आरोपींना हंसराज खरात व अमोल उर्फ चिन्ना खिल्लारे यांनी गावठी कट्टा दिल्याचे अटकेतील आरोपींनी सांगितल्यानंतर या दोघांना अटक करण्यात आली होती.

त्यांची पोलिस कोठडी संपल्यानंतर त्यांना दि.३ रोजी न्या. एस.वाय सुळ यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना १३ दिवसांची न्यायालयिन कोठडी सुनावण्यात आली.

दरम्यान, आरोपींना एक पोलिस कोठडी देण्याची मागणी एपीआय श्री.गोसावी यांनी न्यायालयात केली होती.

यावेळी आरोपींचे वकिल सत्यनारायण पाल यांनी न्यायालयात केलेला युक्तीवाद मान्य करत आरोपींना न्यायालयिन कोठडी सुनावण्यात आली. यावेळी सरकारतर्फे सरकारी वकिल ए.ए. चकेवाड यांनी तर आरोपीतर्फे ऍड. सत्यनारायण पाल यांनी काम पाहिले.