भुसावळ : दोघांकडून गावठी कट्टासह चाकू हस्तगत
जळगाव

भुसावळ : दोघांकडून गावठी कट्टासह चाकू हस्तगत

Ramsing Pardeshi

भुसावळ - प्रतिनिधी :-

शहरातील नहाटा चौफुली भागात अजय गोंडाले व त्याचे दोन साथीदार काहीतरी हेतूने त्या परिसरात फिरत असल्याची गुप्त बातमी बाजारपेठ ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळल्यावरून गुन्हे शोध पथकाला रवाना करून आरोपीकडून एक गावठी कट्टा व चाकू हस्तगत करण्यात आला आहे.

भुसावळ शहरातील नहाटा चौफुली भागात अजय गोंडाले व त्याचे दोन साथीदार काहीतरी हेतूने त्या परिसरात फिरत असल्याची माहिती निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळल्यावरून यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अनिल मोरे,गुन्हे शोध पथकातील पोलीस कर्मचारी पोना रमण सुरळकर,पोकॉ विकास सातदिवे,पोकॉ ईश्वर भालेराव,पोकॉ प्रशांत परदेशी अशांनी घटनास्थळी गेले असता आरोपी अजय गोंडाले, शुभम पचरवाल, विक्रांत उर्फे विक्की अनिल तायडे राहणार भुसावळ हे दोघेही घासीलाल वडेवाल्यांच्या दुकानजवळ उभे असलेले दिसले पोलिसांना पाहून ते पळू लागले पोलिसांनी शिताफतीने त्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता शुभम पचरवाल जवळून १५ हजार रुपये किमतीचे गावठी कट्टा व विक्की जवळून चाकू हस्तगत करून दोघांना बाजारपेठ पोलीस स्टेशनला आणले असून आर्म अँक्ट ३/२५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर यातील अजय गोंडाले हा आरोपी फरार झाला असून पोलीस पथक शोध घेत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com