भुसावळ : करोनाचे नवीन ११४ रूग्ण आढळले

दोघांचा मृत्यू : १७० जण घरी परतले
भुसावळ : करोनाचे नवीन ११४ रूग्ण आढळले

भुसावळ - Bhusawal - प्रतिनिधी :

करोनाची दुसरी लाट तालुक्यात मोठ्या प्रमाणात संसर्ग फैलवत असतांना रूग्णांच्या आकड्यात दि.१२ रोजी ११४ जणांना लागण झाल्यामुळे बाधितांचा आकडा ८ हजार ७४८ इतका झाला आहे.

१७० जणांनी करोनावर विजय मिळवला असल्याने त्यांचा आकडा ७ हजार ३८५ वर पोहोचला आहे. दरम्यान ६२ व ७० वर्षीय महिलांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा २५७ वर पोहोचला आहे.

अद्याप १ हजार १०६ जणांवर विविध कोविड रुग्णालयात उपचार सुरु आहे.
दरम्यान प्रशासनाकडून नागरिकांना कोविड-१९ लस देण्यात येत आहे.

लसीचा तुटवडा जाणवत असल्यामुळे शहरातील १२ पैकी केवळ तीनच केंद्रांमधून लसीकरण देण्यात येत आहे. यामुळे अनेकांना लसीपासून वंचित राहावे लागत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com