करोनामुक्त
करोनामुक्त
जळगाव

अरे बापरे ..! करोनामुक्त शिक्षक पुन्हा बाधित

बरे झालेल्या रुग्णांना घरी सोडतांना खात्री होणे आवश्यक

Ashish Patil

Ashish Patil

वरणगांव फॅक्टरी - वार्ताहर -Bhusawal :

वरणगांव येथील शिवाजीनगरमधील शिक्षक असलेले यांना कोरोनाची लागण झाली होती .परंतु उपचार घेऊन घरी आल्यानंतर पंधरा दिवस घरातच क्वारंटाईन राहिल्यानंतर त्यांनी गावातच दिलेल्या स्वॅबचा रिपोर्ट पॉझिटिव आला आहे .

याबाबतची सविस्तर माहिती अशी की सदरील शिक्षक व त्यांच्या पत्नीस दि. ८ जुलै रोजी श्वासनाचा त्रास जाणवल्यामुळे ते पत्नीसह त्यांनी गोदावरी रुग्णालय गाठले. मरणप्राय यातना होत असतांना देखिल तेथिल व्यवस्थापनाने त्यांना पिटाळून लावले. तेथील सीएमओ डॉ. श्रीकांत जाधव हे त्यांचे मित्र असल्यामुळे त्यांनी तात्काळ एक्सरे काढून डॉ. समिती पुढे निरिक्षणासाठी ठेवले असता त्यामध्ये धोकेदायक लक्षण आढळून आली व त्यावरून मग रात्री १० वाजता कोविड विभागात ऍडमिट करून घेण्यात आले.

दि .८ जुलै रोजी तेथे स्वॅब घेण्यात आले. शनिवारी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव आल्यानंतर त्यांना कोविड विभागात दाखल करण्यात आले होते. तेथे दि.२० जुलैपर्यंत पूर्ण उपचार घेऊन त्यांना २१ जुलै रोजी घरी सोडण्यात आले. तेव्हा पासुन ४ ऑगस्टपर्यंत ते होम क्वारंटाईन होते.

परंतु शिक्षकी पेशा असल्यामुळे आपल्याला ज्ञानदानाचे काम करावेच लागणार आहे. असा विचार त्यांच्या मनात आल्यामुळे. शहरात आयोजित कॅम्पमध्ये खात्री करून घेण्यासाठी त्यांनी स्वॅब दिला असता. दि. ६ रोजी त्यांचा अहवाल पुन्हा पॉझिटिव आला आहे. व त्यांना पुन्हा भुसावळ येथिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोविड सेंटरला भरती करण्यात आले आहे.

एका उच्चशिक्षित व्यक्तीच्याबाबत जर असे घडत असेल तर इतरांचे काय? नागरिक आधिच कोविडला घाबरून चाचणी करण्यासाठी पुढे येत नाहीत. व जे रुग्ण पॉझिटिव होऊन उपचार घेतात त्यांची काळजी घेतली जात नाही.

अर्ंतज्ञानी डॉक्टरांच्या मनाप्रमाणे पूर्ण उपचार घेतल्यावर पेशंटची चाचणी न घेता त्यांना कोविड योद्धा पदवी देऊन घरी सोडले जाते. व सत्कार कार्यक्रम होत आहेत.आजपर्यंत अनेक उच्चभ्रू लोकांना कोरोनाची लागण झाली परंतु त्यांचा अहवाल निगेटिव आल्याशिवाय ते घरी गेले नाहीत. म्हणजे श्रीमंतांसाठी वेगळा न्याय व गरीबांसाठी वेगळा न्याय असे का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे .

म्हणून डिस्चार्ज होणारी व्यक्ती निगेटिव की पॉझिटिव्ह अशी खात्री देता येत नाही. त्यातील समाजात मिसळणारे रुग्ण इतरांना बाधित करण्याची शक्यता नाकारता येत नाही. व कोरोनाची साखळी तुटणे अशक्य आहे म्हणून शासनाने याबाबीकडे जातीने लक्ष देऊन याबाबीचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com