अज्ञात वाहनाच्या धडकेत तळवेलचे तीन तरुण ठार

फुलगाव उड्डानपुलावरील घटना
अज्ञात वाहनाच्या धडकेत तळवेलचे तीन तरुण ठार

वरणगाव फॅक्टरी, ता.भुसावळ - Bhusawal - वार्ताहर :

फुलगाव बायपास महामार्गावर मोटरसायकलने भुसावळकडून तळवेलकडे जात असतांना अज्ञात वाहनाच्या धडकेत तीन तरुण ठार झाल्याची घटना मंगळवार, दि.25 मे रोजी दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास घडल्याने तळवेल गावात शोककळा पसरली आहे.

येथुन जवळच असलेल्या तळवेल येथील तीन तरुण सकाळी भुसावळ येथे काही कामासाठी गेले होते. मोटरसायकल क्र. एमएच 19 यु 7863 ने घरी येत असतांना कोणत्या तरी अज्ञात वाहनाने जबर धडक दिली.

यात डोक्याला जबर मार लागल्याने विवेक सुनील पाटील (वय 17, शिक्षण आयटीआय मुक्ताईनगर) हा घटना स्थळावर मयत झाला तर देवानंद सोपान पाटील (वय 16, शिक्षण 10 वी नेहरू विद्यालय तळवेल), तुषार राजेंद्र पाटील (वय 17, शिक्षण 10वी, तीघे राहणार तळवेल ता.भुसावळ) या दोघे जखमींना डॉ.उल्हास पाटील गोदावरी वैद्यकिय महाविद्यालय जळगाव या रुग्णालयात दाखल केले.

उपचार घेत असतांना वैद्यकिय आधिकार्‍यांनी दोघांना मृत घोषीत केले. विवेक पाटील याचे शवविच्छेदन वरणगाव ग्रामिण रुग्णालयात वैद्यकिय अधिकारी डॉ.क्षितीजा हेंडवे यांनी केले तर देवेंद्र पाटील व शाम पाटील या दोघांचे शवविच्छेदन जळगाव सामान्य रुग्णालयात करण्यात आले.

अनिल प्रभाकर पाटील (रा.तळवेल) यांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलिसात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तपास सपोनि संदिप बोरसे, हेकॉ मनोहर पाटील, मुकेश जाधव, नागेंद्र तायडे, होमगार्ड महेश पाटील करीत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com