कंटेनरची लक्झरीला धडक एक ठार

26 जण जखमी : राष्ट्रीय मार्गावरील कपिलवस्ती नगर जवळील घटना
कंटेनरची लक्झरीला धडक एक ठार

फेकरी, ता. भुसावळ - Bhusawal - वार्ताहर :

तालुक्यातील कपिल वस्ती नगर जवळ नॅशनल हायवे क्रमांक 6 वर फोरवेचे काम सुरू असून रहदारीसाठी रस्ता वनवे केल्याने कपिल वस्ती नगर जवळ भरधाव कंटेनरने स्लीपर कोच लक्झरीला मध्य रात्री च्या सुमारास धडक दिल्याने यात सुरत येथिल प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर दहा प्रवासी गंभीर जखमी व 16 प्रवासी किरकोळ जखमी असे 26 प्रवासी जखमी झाले आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, दारव्हा कडून सुरतला जाणारी स्लीपर कोच लक्झरी क्रमांक जी.जे.17 यू.यू. 0345 ही व मुंबईकडून नागपुर कडे जाणारे अवजड वीस चाकी वाहन कंटेनर क्र. सी जी 4 टी.ए.0055 हे राष्ट्रीय महामार्गावरील कपिल वस्तीनगरजवळून 2 रोजी मध्यरात्रीच्या दरम्यान जात असताना महामार्गावर क्र. 6 वर काम सुरू असल्याने तेथे एकेरी वाहतूक सुरू असून तेथे कोणतेही सूचना फलक लावलेले नसल्यामुळे वाहन चालकांना रस्त्याचा अंदाज न आल्याने दोघं वाहनधारकांचे वाहनावरून नियंत्रण सुटून भीषण अपघात झाला. या अपघातात स्लिपर कोच ट्रॅव्हल्स मधील प्रवासी सैय्यद आकबर सैय्यद उस्मान (वय 50 रा.मिठी खाडी सुरत) या प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला

जखमींमध्ये यांचा समावेश- वैभव सुरडकर (वय 21, रा. पिंपळगाव जि. अकोला),विमल मोरे (वय 43 रा.निमगाव जि.बुलढाणा) या महिलेला सुद्धा डोक्याला जबर मार लागला. नागराव चव्हाण (वय 50 रा.खेडबीड जि. यवतमाळ), किसन रामु राठोड (वय 45, रा. खेडबीड जि. यवतमाळ, प्रशांत इंगळे (वय 36 रा. डोंगरगाव ता. बाळापूर), ललिता राठोड (वय 26, रा. डोलारी ता. दारव्हा), वैष्णवी गवळी (वय 17,), माही राठोड (वय 6, रा. दमानी जि. वाशिम), प्रवीण चव्हाण (रा.दारव्हा), ज्ञानेश्वर काळंबडे (वय 27, शिवनी जि. हिंगोली, रमेश यादव (वय 30), प्रीती यादव (वय 20 रा. यवतमाळ), संतोष इंगळे (वय 50), ज्योती इंगळे (वय 38), आरती इंगळे (वय 17), प्रिया इंगळे (वय 20), विष्णू राठोड (वय 60), आदिती जाधव (वय 9), सत्यमामा गायकवाड (वय 34) ,आशिष गायकवाड (वय 13, रा. शेगाव), पूजा गिरे (वय 18), देवानंद गावडे (वय 43, रा. यवतमाळ) असे 26 प्रवासी जखमी झाले.

अपघाता नंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व कपिल नगर वस्तीतील अजय इंगळे यांनी स्लीपर कोच ट्रॅव्हल्स चालक अशोक पटेेल (वय 45,रा. तारोली जि. सुरत), स्लीपर कोच ट्रॅव्हल्स क्लिनर विशाल एकनाथ बावस्कर (वय 21, रा. घाट, सिल्लोड) कंटेनर चालक कुलदीप सिंग यास रुग्णवाहिका बोलवून जळगाव सिव्हिल रुग्णालयात दाखल केले.

स्लीपर कोच ट्रॅव्हल्सचे मालक महिंद्रा यांना अपघाताची माहिती देऊन सुद्धा त्यांनी वेळीच प्रवाशाना कोणत्याही प्रकारची पुढील प्रवासाची व्यवस्था न केल्याने जखमी प्रवाशांचे खूप हाल झाले. प्रसंगी कपिल नगर वस्ती मधील सुरेखा हरी मोरे यांच्या पुढाकाराने संपूर्ण कपिल वस्ती नगरातील नागरिकांनी अपघातग्रस्तांना चहा, पोहे, जेवण अशी व्यवस्था केली.

घटनेची माहिती मिळताच वरणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सैय्यद फारुख सैय्यद उस्मान (रा.मिठी खाडी सुरत) यांच्या फिर्यादीनुसार कंटेनर चालक कुलदीपसिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रसंगी जखमी प्रवाशांना घटनास्थळी डॉक्टरांनी मलमपट्टी करून प्रथम उपचार केला व मयताला शवविच्छेदनासाठी वरणगाव रुग्णालयात पाठविण्यात आले. डॉ. निखिल तायडे यांनी शवविच्छेदन केले व सकाळी 11 वाजेच्या दरम्यान त्यांना सुरत येथे रुग्णवाहिकेद्वारे पाठविण्यात आले. पुढील तपास सपोनि संदीपकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली हे.काँ. मनोहर पाटील करीत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com