चौपदरी रस्त्याने घेतला पुन्हा बळी

आठवडाभरातील दुसरी घटना
चौपदरी रस्त्याने घेतला पुन्हा बळी
मयत गजानन खंडारे

फेकरी, ता.भुसावळ - Bhusawal - वार्ताहर :

दिपनगर वीज केंद्राच्या ५०० मेगावट प्रकल्पाच्या समोर व महामार्गाच्या चौपदरी रस्त्याचे काम सुरु असुन दिपनगर वीज केंद्रातील कंत्राटी कामगार गजानन खंडारे (वय ४५, रा.निंभोरा बु) हे पुलाजवळुन जात असतांना,

त्यांना काम सुरु असलेल्या पूलाजवळ कोणत्याही प्रकारचे सुचना फलक लावलेले नसुन व पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे ते पुलाखाली पडले व त्यांच्या डोक्याला लोखंडी पाईपाचा जबर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुल, एक मुलगी असा परिवार असुन ते दिपनगर येथील कर्मचारी मिलिंद खंडारे यांचे चुलत भाऊ होते. या घटनेची खबर शशिकांत खंडारे यांनी दिल्यावरून भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

तपास पोनि रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोकॉ शामकुमार मोरे करीत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com