
भुसावळ - डिअरएम कार्यालय येथे स्वच्छता संवाद आणि कोविड- 19 दरम्यान या विषयावर वेबिनार आयोजित करण्यात आला.
त्यात भुसावळ विभागातील सुमारे 50 जण सहभागी झाले होते. वेबिनार यशस्वी करण्यासाठी विभागीय मेकॅनिकल अभियंता के.के. शर्मा यांनी विशेष सहकार्य केले.
वेबिनारचे आयोजन सहाय्यक विभागीय यांत्रिकी अभियंता युनूस अन्सार यांनी आयोजित केले होते, एडीआरएम मनोजकुमार सिन्हा यांची विशेष उपस्थिती होती.
यानिमित्ताने बडनेरा, देवळाली, खंडवा, भुसावळ, मलकापूर, नाशिक, मूर्तिजापूर, अकोला, जळगाव, पाचोरा स्थानकांवर रेल्वे कर्मचार्यांनी संवाद रॅली काढली.
मनमाड व शेगाव स्थानकांवर सीआरएमएसतर्फे संवाद रॅली काढण्यात आली. चाळीसगाव रोटरी क्लब मिल्क सिटीच्या वतीने संवाद रॅली काढण्यात आली, या संवाद रॅलीमध्ये कर्मचारी व वरिष्ठ विभागीय यांत्रिकी अभियंता एस. लक्ष्मी नारायण व सर्व शाखा अधिकारी पूर्ण उत्साहात सहभागी झाले.