डॉक्टरला खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी

चौघांविरुद्ध गुन्हा दाखल,पोलिस अधिक्षकांची भुसावळला भेट : पिस्टल, तलवारीचा दाखविला धाक
डॉक्टरला खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी

भुसावळ - Bhusaval - प्रतिनिधी :

मला दर महिन्याला 50 हजार रुपये देण्यात यावे अशी धमकी देऊन शिविगाळ करुन पैसे न दिल्यास पिस्टल व तलवारीचा धाक दाखवून

जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद येथील डॉ. स्वप्नील राजाराम कोळंबे यांनी बाजारपेठ पोलिसात दिली. त्यामुळे कलीम शेख सलीम याच्यासह चार जणांविरुद्ध बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात खुन गावठी कट्ट्यांचा उत यामुळे गुन्हेगारांनी तोंड वर काढले आहे. त्यात डॉक्टरला खंडणी मागितल्यामुळे खळबळ उडली आहे. दरम्यान या गुन्ह्याची दखल घेऊन पोलिस अधिक्षक प्रवीण मुंढे यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्याला भेट देऊन सबंधित अधिकार्‍यांना तापासाबाबात सुचना दिल्या.

पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,येथील जामनेर रोड वरील दिनदयाल नगर समोरील कोळंबे हॉस्पिटलचे डॉ. स्वप्नील राजाराम कोळंबे (वय 38) यांना दीनदयाल नगरातील रहिवासी असलेल्या शे. कलीम शे. सलीम याने दर महिन्याला 50 हजार रुपयांची खंडणी मागितली आहे.

दरम्यान दि. 12 रोजी सायंकाळी तीघांनी हॉस्पिटलात दाखल होत. ‘कलीम भाईने हफ्ता मांगा है, कलीम भाई को हफ्ता देना पडेगा. यह हमारा एरिया है. डॉक्टर को दवाखाना चलाना है कि नही.हप्ता नही देने पर दवाखाना बंद कर देंगे. असा दम कार्मचार्‍यांना भरला.

या नंतर दवाखान्यातील कर्मचार्‍यांना रस्त्यावर गाठून ही धमक्या देण्यात आल्या. त्यानंत दि. 13, 14, 20 व 21 रोजी पिस्टल व तलवार बाळगत दवाखान्याच्या परिसरात येवून धमकाव्याचा प्रयत्न करत दर महिन्याला 50 हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली.

याबाबत बाजारपेठ पोलिसात डॉ. स्वप्नील कोळंबे यांच्या फिर्यादीनुसार शेख कलीम शे.सलीम, संदीप (पूर्ण नाव माहित नाही) सह चौघांविरुद्ध गु.र.नं. 901/ 20, भा.दं.वि. 387, 504, 506, 507, 34, आर्म अ‍ॅक्ट 3/25, 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास एपीआय मंगेश गोटला करित आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com