भुसावळ @ 169

आतापर्यंतचा सर्वाधिक उच्चांक
भुसावळ @ 169

भुसावळ - Bhusaval - प्रतिनिधी :

संंपूर्ण जगात करोना फैलाव करत असतांना सुरुवातीला शहरासह तालुक्यात रुग्ण आढळून आले नाही. त्यासाठी प्रशासनाकडून तशी तयारी ही करण्यात आली होती.

मात्र 25 एप्रिल रोजी समता नगरातील महिलेला कोरोनाची लागण होताच शहरात संसर्गाचा मोठ्या प्रमाणात वाढण्यास सुरुवात झाली.

दरम्यानच्या काळात रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठत दि. 28 रोजी सर्वाधिक 169 रुग्णांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली.

शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यापासून प्रशासनाच्या वतीने बाधित रुग्णांच्या संपर्कातील स्वॅव, संपर्कातील नागरिकांची यादी व त्यांना क्वॉरंटाईन करण्यास सुरुवातही केली. यातील अनेकांना बाधा झाली तर अनेक निगेटिव्ह आढळून आले.

मात्र रुग्णांचा आकडा वाढतच आहे. दि. 26 सप्टेंबर रोजी आतापर्यंतचा सर्वाधिक 169 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या 3265 वर पहोचली आहे. तर 6 जण घरी परतले आहे.

त्यामुळे कोरोनामुक्त होणार्‍यांची संख्या 2281 वर पोहचली आहे. तर अद्याप 839 जणांवर विविध कोविड रुग्णालयात उपचार सुरु आहे. तालुक्यात आतापर्यंत 135 जणांना मृत्यू झाला आहे.

दरम्यान, सध्या अनलॉक असल्यामुळे नागरिकांचा वावर सर्रास मोठ्या प्रमाणात सुरु आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता नाकारात येत नाही.

यासाठी प्रशासनाकडून नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. शिवाय जिल्हाधिकारी यांच्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या उपक्रमात प्रशासनाच्यावतीने रबविण्यात येत आहे.

नागरिकांनी तपासणीसाठी आलेल्या कर्मचार्‍यांना सहकार्य करण्याचे व नागरिकांनी घरातच राहण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com