भुसावळ - Bhusaval - प्रतिनिधी :

रेल्वेने राज्यांतर्गत विशेष 6 आरक्षित गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे, नागपूर, अजनी, अमरावती, कोल्हापूर, गोंदिया दरम्यान या विशेष गाड्या धावणार आहेत.

पुणे नागपुर पुणे हमसफर विशेष- गाडी क्र.01417 डाउन विशेष गाडी दि. 15 ऑक्टोबरपासून दर गुरुवारी रात्री 10 वाजता रवाना होऊन दुसर्या दिवशी दुपारी 1.30 वाजता नागपुर पोहचेल.

गाडी क्र. 01418 अप विशेष गाडी दि. 16 ऑक्टोबरपासून दर शुक्रवारी दुपारी 3 वाजता रवाना होऊन दुसर्या दिवशी सकाळी 8.05 वाजता पुणे पोहचेल. ही गाडी बडनेरा, अकोला, भुसावळ, चाळीसगांव, मनमाड स्थानकांवर थांबेल. या गाडीला 15 वातानुकूलित तृतीय श्रेणी असतील.

पुणे अजनी-पुणे विशेष- गाडी क्र. 02239 डाउन पुणे अजनी विशेष गाडी दि. 17 ऑक्टोबर पासून दर शनिवारी रात्री 10 वाजता रवाना होऊन दुसर्या दिवशी दुपारी 1.15 वाजता अजनी पोहचेल.गाडी क्र. 02240 अप विशेष गाडी 18 ऑक्टोबर पासून दर रविवारू सायंकाळी 7.50 वाजता रवाना होउन दुसर्या दिवशी 11.45 वाजता पुणे पोहचेल. ही गाडी बडनेरा, अकोला, भुसावळ, चालीसगांव, मनफाड स्थानकांवर थांबेल या गाडीला 13 वातानुकूलित तृतीय श्रेणी डबेे असतील.

अमरावती पुणे विशेष- गाडी क्र. 02117 डाउन पुणे अमरावती विशेष गाडी दि. 14 ऑक्टोबर पासून दर बुधवारी दुपारी 3.15 वाजता रवाना होइल आणि दुसर्या दिवशी दुपारी 3.15 वाजता अमरावती पोहचेल. गाडी क्र. 02118 अप अमरावती पुणे विशेष गाडी दि. 15 पासून दर गुरुवारी सायंकाळी 6.35 वाजता रवाना होऊन दुसर्या दिवशी सकाळी 7.40 वाजता अमरावती पोहचेल.

पुणे अजनी पुणे विशेष- गाडी क्र. 02223 डाउन पुणे अजनी विशेष गाडी दि. 16 पासून दर शुक्रवारी दुपारी 3.15 वाजता रवाना होऊन दुसर्या दिवशी पहाटे 5.15 वाजता अजनी पोहचेल. गाडी क्र. 02224 अप अजनी - पुणे विशेष गाडी दि. 13 पासून दर मंगळवारी सायं. 7.50 वाजता रवाना होऊन दुसर्या दिवशी 11.45 वाजता पुणे पोहचेल.

कोल्हापुर गोंदिया विशेष- गाडी क्र. 01039 डाउन कोल्हापुर गोंदिया विशेष गाडी दि. 11 ऑक्टोबर पासून दररोज दुपारी 3.20 वाजता रवाना होउन दुसर्या दिवशी गोंदिया पोहचेल. गाडी क्र.01040 अप गोंदिया कोल्हापुर विशेष गाडी दि. 13 पासून दररोज गोंदिया येथून सकाळी 8.15 वाजता रवाना होऊन दुसर्या दिवशी दुपारी 12.50 वाजता कोल्हापुर पोहचेल.

मुंबई -नांदेड विशेष- गाडी क्र. 01141 डाउन मुंबई नांदेड विशेष गाडी दि. 11 पासून दररोज मुंबई येथून दुपारी 4.35 वाजता रवाना होउनदुसर्या दिवशी पहाटे 5.35 वाजता नांदेड पोहचेल. गाडी क्र. 01142 अप नांदेड - मुंबई विशेष गाड़ी ही दिनांक 12.10.2020 पासून पुढील आदेश पर्यंत दररोज प्रस्थान स्टेशन 17.00 वाजता रवाना होइल आणि दुसर्या दिवशी मुंबई 05.35 वाजता पोहचेल. ही गाडी मनमाड, लासलगांव, नाशिक स्थानकांवर थांबेल.

प्रवाशांना या विशेष गाड्यांमधून प्रवास करतांना कोविड-19 शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागणार आहे. प्रवाशांनी विशेष गाड्यांचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.