भुसावळ - प्रतिनिधी - Bhusaval :

करोना साथीच्या काळातही रेल्वे प्रशासन सावधगिरीने आपले काम करीत आहे, या गंभीर साथीच्या काळातही मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाच्या वाणिज्य विभागाकडून अनियमित प्रवास करणार्या प्रवाशांवर आळ बसविण्यासाठी दि.११ रोजी विशेष तिकीट तपासणी मोहीम घेण्यात आली .

यात १३७ अनियमित प्रवाशांकडून ७८ हजार ९० रुपयांचा दंड विशेष तिकीट तपासणी निरीक्षक वाय डी पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली

सिनियर डिसीएम युवराज पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार व विभागीय वाणिज्य व्यवस्थापक बी. अरुण कुमार, सहायक वाणिज्य प्रबंधक (तिकिट तपासणी) अनिल पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम आयोजित करण्यात आली होती.

या मोहिमेत१३७ अनियमित प्रवाशांना दंड आकारण्यात आल आहे. ही कारवाई २१ तिकीट तपासणी कर्मचारी आणि १० आरपीएफ कर्मचार्यांनी प्रवाशांकडून ७८ हजार ९० रूपये दंड वसूल करण्यात आला आहे.

यात दंड भरण्यात असमर्थ असणार्या ७ जणांवर भा.दं.वि.१३७, १४४, १४७ नुसार कार्यवाही करण्यात आली आहे.प्रवाशांनी योग्य तिकिटासह प्रवास करावा. करोनाला साथीच्या रोगाचा धोका टाळण्यासाठी दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.