संत सावता महाराज मंदिराचा भूमिपूजन सोहळा
जळगाव

संत सावता महाराज मंदिराचा भूमिपूजन सोहळा

पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांची उपस्थिती

Rajendra Patil

नशिराबाद - Nashirabad

जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे संत सावता महाराज मंदिर जिर्णोध्दार व भुमिपूजन सोहळा होणार असून कार्यक्रमास पालकमंत्र्यांसह खासदार, आमदार यांची उपस्थिती लाभणार असून हा सोहळा....

नशिराबाद येथील वरची आळी भागातील श्री संत शिरोमणी सावता महाराज व विठ्ठल-रूक्मिणी मंदिराचा जीणोध्दार व भूमिपूजन सोहळा शनिवार दि.२२ ऑगस्ट रोजी सकाळी १० वा. होणार आहे.

शासन नियमांचे पालन करत सोशल डिस्टन्सिंगने हा सोहळा पार पडणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, खा.उन्मेश पाटील, आ.सुरेश भोळे यांची उपस्थिती लाभणार आहे. तसेच जि.प.उपाध्यक्ष लालचंद पाटील, सरपंच विकास पाटील यांची विशेष उपस्थिती राहील.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com