BHR प्रकरणात मोठी कारवाई : पुण्याहून 40 जणांचे पथक, 12 जणांना अटक

जळगाव जिल्ह्यातील उद्योजक व राजकीय नेत्यांचा समावेश
BHR प्रकरणात मोठी कारवाई : पुण्याहून 40 जणांचे पथक, 12 जणांना अटक
USER

जळगाव ;

पुणे आर्थिक गुन्हे शाखेने आज गुरूवारी पहाटेपासूनच कारवाईचा सपाटा लावला. पुण्याहून आलेल्या 40 जणांच्या पथकांने आतापर्यंत 12 जणांना अटक केली आहे. यात अनेक जण कर्जदार असल्याचे समजते.

जळगाव दालमिल असोसिएशनचे अध्यक्ष तसेच कोगटा ग्रुप उद्योगसमूहाचे डायरेक्टर प्रेम नारायण कोगटा यांना पुणे आर्थिक गुन्हे शाखेने पुण्यातील रिट्झ कार्टलॉन य‍ा हॉटेलातून पहाटे ताब्यात घेतले असल्याची माहिती उपआयुक्त भाग्यश्री नवटके यांनी दिली आहे.

पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज गुरुवारी जळगाव जामनेर भुसावळ पाळधी येथून सात जणांना अटक केली आहे. कोगटा यांना पुण्यातील हाॅटेलातून ताब्यात घेतले. पथकाने जळगाव शहरातून भागवत भंगाळे , पाळधी येथुन जयश्री मणियार, संजय तोतला तर भुसावळ येथील राजकीय पदाधिकारी आसिफ मुन्ना तेली , जामनेर येथील जितेंद्र रमेश पाटील, छगन शामराव झाल्टे, राजेश शांतीलाल लोढा यांना अटक केली आहे. पुण्यातील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून त्यांनाही अटक करण्याची कारवाई सुरू आहे.औरंगाबादच्या आदर्श महिला बँकेचे संस्थापक अध्यक्ष अंबादास मानकापे यांना पहाटे पाच वाजता राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्यांचा मुलगा अनील अंबादास मानकापे यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

आतापर्यंत अटक

1) प्रितेश चंपालाल जैन (धुळे)2) अंबादास बाबाजी मानकापे (औरंगाबाद)3) जयश्री अंतिम तोतला (मुंबई) 4) भागवत भंगाळे (जळगाव) 5) छगन झाल्टे (जामनेर),6) जितेंद्र रमेश पाटील जामनेर 7) आसिफ मुन्ना तेली (भुसावळ), 8) जयश्री मणियार (जळगाव),9) संजय तोतला (जळगाव),10) राजेश लोढा (जामनेर), 11 )प्रेम कोगटा 12)अनील अंबादास मानकापे

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com