बीएचआर पतसंस्था घोटाळा : जिल्ह्यातून आणखी सात जणांना अटक

दिग्गजांचा समावेश ; पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे ४० जणांचे पथक पुन्हा जळगावात

जळगाव ; बीएचआर पतसंस्थेच्या गाजत असलेल्या घोटाळ्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेने दुसरा दणका दिला असून आज पहाटेच जळगाव जिल्ह्यातून सात जणांना अटक केली आहे. यात राजकीय पदाधिकाऱयांसह दिग्गजांचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुणे येथील डेक्कन पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई सुरू आहे. यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे चाळीस हून अधिक कर्मचारी अधिकाऱ्यांचे पथक आज गुरुवारी पहाटेच जळगाव जिल्ह्यात दाखल झाले आहे. यात पथकाने जळगाव शहरातून भागवत भंगाळे , पाळधी येथुन जयश्री मणियार, संजय तोतला तर भुसावळ येथील राजकीय पदाधिकारी आसिफ मुन्ना तेली , जामनेर येथील जितेंद्र रमेश पाटील, छगन शामराव झाल्टे, राजेश शांतीलाल लोढा या सात जणांना अटक केली आहे. पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकाचवेळी सर्व जणांना ताब्यात घेतले. पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची कारवाई सुरू आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com