सूरज झंवरला 16 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी

सूरज झंवरला 16 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

बीएचआर प्रकरणात अटक केलेला सूरज सुनील झंवर (29,रा.जयनगर, जळगाव) याला पुणे विशेष न्यायालयाने मंगळवारी 16 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.

त्यामुळे त्याला लागलीच पुणे कारागृहात रवाना करण्यात आले.

बीएचआर घोटाळ्याप्रकरणी पुणे येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात सूरज झंवर याला 22 जानेवारी रोजी पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगावातून अटक केली होती. दुसर्‍या दिवशी त्याला न्यायालयात हजर केले असता 11 दिवसाची पोलीस कोठडीसुनावली होती.

सुरज झंवर हा याच गुन्ह्यात फरार असलेल्या मुख्य संशयित सुनील झंवर याचा मुलगा आहे. त्याचाही आर्थिक गुन्हे शाखेकडून कसून शोध घेतला जात आहे.

दरम्यान, या गुन्ह्यात प्रकाश जगन्नाथ वाणी (ठाणे) व अनिल रमेशचंद्र पगारिया (रा.शिवराम नगर) या दोघांना 3 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केलेला आहे. सरकारपक्षातर्फे अ‍ॅड.प्रवीण चव्हाण यांनी बाजू मांडली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com