जळगाव - Jalgaon :
बीएचारआर घोटाळ्याप्रकरणी पुणे येथे दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये पुणे आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या सुरज सुनील झंवर यास पुणे न्यायालयाने 2 फेब्रुवारीपर्यंत 11 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
बीएचआर घोटाळ्याप्रकरणी शिवाजीनगर पुणे येथे दाखल गुन्ह्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासात सूरज झंवर याचा सहभाग निष्पन्न झाला होता.
त्यानुसार पथकाने 22 जानेवारी रोजी सूरज झंवर यास त्याच्या जळगाव शहरातील जयनगर येथील राहत्या घरुन अटक केली.
याबाबत रामानंदनगर पोलिसात नोंद करण्यात येवून सूरज झंवर यास घेवून पथक पुणे येथे रवाना झाले होते. त्यास शनिवारी पुणे येथील न्यायालयात हजर करण्यात आले .
न्या. एस.एस. गोसावी यांनी त्यास 2 फेब्रुवारीपर्यंत 11 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, बीएचआर घोटाळ्यात सुनील झंवर यांच्या इतकाच त्याचा मुलगा सूरज झंवर याचाही सहभाग आहे. यात पुणे निगडी येथील चार दुकाने तसेच नशिराबाद येथील दुकाने अशी बीएचआरची मालमत्ता कवडीमोल भावात खरेदी करणे, मालमत्ता खरेदीसाठी नातेवाईकांच्या नावाने निविदा भरणे, मालमत्ता खरेदी करणे यासह अनेक गोष्टीत त्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यावर त्याला पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.