बीएचआर पतसंस्था घोटाळा : दोघां संशयितांच्या शोधार्थ पथक जळगावात

संशयित सांखलाच्या आई, पत्नीचा नोंदविला जबाब
बीएचआर पतसंस्था घोटाळा : दोघां संशयितांच्या शोधार्थ पथक जळगावात

जळगाव -Jalgaon - प्रतिनिधी :

बीएचआर प्रकरणात पुण्यात दाखल गुन्ह्याच्या संदर्भात पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे पथकाने गुरुवार, 20 जानेवारी रोजी शिवकॉलनीतील योगेश सांखलांच्या पत्नी व आईचा जबाब नोंदविला आहे.

दोघांच्या जबाबासह योगेश सांखला व सुनील झंवर या दोघांचा शोध घेण्यासाठी हे पथक शहरात आले असल्याची माहिती मिळाली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बीएचआर घोटाळ्याप्रकरणी दोन दिवसांपासून पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे जळगावात दाखल झाले आहे.

या पथकाकडून पुणे येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात जबाब नोंदविण्यासह इतर कार्यवाही सुरु आहेत. बुधवारी या पथकाने शहरातून काही माहिती संकलित केली.

यानंतर आज गुरुवारी योगेश किशोर सांखला यांच्या शिव कॉलनीतील शिवशक्ती अपार्टमेंटच्या समोरील निवासस्थानी जाऊन त्याची पत्नी व आई या दोघांचा जबाब नोंदविला. जबाब नोंदविण्यासाठी जाण्यापूर्वी पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने रामानंद नगर पोलीस ठाण्यात जाऊन रितसर नोंद केली.

दोघांच्या जबाबासह योगेश सांखला व सुनील झंवर या दोघांचा शोध घेण्यासाठी हे पथक शहरात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com