बीएचआर पतसंस्था घोटाळा : कुणाल शहाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

सुनील झंवर, जितेंद्र कंडारेंच्या अडचणींमध्ये वाढ
बीएचआर पतसंस्था घोटाळा : कुणाल शहाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

बीएचआर घोटाळयात बीएचआर संस्थेची बनावट वेबसाईट बनाविणारा सॉफ्टवेअर इंजिनिअर कुणाल शहा याचा अटकपूर्व जामीनअर्ज पुणे विशेष न्यायालयाने आज 19 रोजी फेटाळून लावला आहे.

बीएचआरप्रकरणात पुणे आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईनंतर या गुन्ह्यातील संशियत कुणाला शहाचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळल्यानंतर याच गुन्ह्यात फरार मुख्य संशयित सुनील झंवर व जितेंद्र कंडारेंच्या अडचणीत वाढ झाली असल्याची चर्चा आहे.

कुणाल शहा रडारवर

पुणे आर्थिक गुन्हे शाखेने छापेमारी करुन याप्रकरणी जळगावातील विवेक ठाकरे, महावीर जैन, धरम सांखला, सुजीत वाणी या संशयितांना अटक केली होती. गुन्ह्यात बनावट वेबसाईट बनविणारा कुणाल शहा याने न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. त्यावर आज मंगळवारी पुणे विशेष न्यायालयाचे न्या. एस.एस. गोसावी यांच्या न्यायालयात कामकाज झाले. न्या. गोसावी यांनी अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळून लावला आहे.

सुनील झंवरलाही होते अ‍ॅसेस

बीएचआर घोटाळ्यातील संशयित जितेंद्र कंडारे यांच्यासह संशयितयांनी बीएचआर संस्थेच्या बनावट वेबसाईट ह्या गुजरात राज्यातील कुणाल शहा यांच्याकडून बनवून घेतल्या होत्या. याच बनावट वेबसाईच्या माध्यमातून बीएचआरच्या विविध ठिकाणच्या मालमत्तांची कवडीमोल भावात विक्री करण्यात आली होती.

कुणाल शहा याने बीएचआरच्या बनावट वेबसाईटचे सुनील झंवर यालाह असेस होते. म्हणजे कुणाल शहा प्रमाणेच झंवर सुध्दा केव्हाही ही वेबसाईट हाताळू शकत होता.

सुनील झंवरच्या कार्यालयातून याबाबत तांत्रिक पुरावे पुणे आर्थिक गुन्हे शाखेने हस्तगत केले आहे. ठेवीदारांच्या ठेवींवर हा एकप्रकारे दरोडाच आहे, असा युक्तीवाद सरकारी वकील अ‍ॅड प्रवीण चव्हाण यांनी केला. या युक्तीवादाअंती न्यायालयाने शहा याचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळला आहे.

ठाकरे, वाणी, जैन यांच्या जामीनावर 21 ला निकाल

बीएचआर घोटाळ्याप्रकरणी अटकेतील संशयित विवेक ठाकरे, महावीर जैन, सुजीत वाणी, धरम सांखला या संशयितांनी जामीन अर्ज दाखल केले आहेत. ठाकरे, जैन, वाणी यांच्या अर्जावर युक्तीवाद पूर्ण झाला आहे. यात मंगळवारी धमर सांखला यांच्याही जामीनअर्जावर युक्तीवाद पूर्ण झाला. आता सर्व संशयितयांच्या जामीनाच्या निकालावर गुरुवार 21 रोजी कामकाज होणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com