जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

शहरात विविध ठिकाणी बीएचआरप्रकरणी पुणे येथे दाखल गुन्ह्यात पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेने छापे टाकले होते.

यावेळी संशयित अवसायक जितेंद्र कंडारेचा खास माणूस असलेला सुजीत वाणी आर्थिक गुन्हे शाखेच्या अधीक्षकांना पाहून कॅबिन बंद करुन पळून गेला होता.

तसेच त्याने अधिकार्यांना रेकार्ड उपलब्ध करुन दिले नव्हते. असा युक्तीवाद आज पुणे येथील न्यायालयात सुजीत वाणी याने दाखल केलेल्या जामीनअर्जावर सरकारपक्षातर्फे करण्यात आला.

बीएचआरप्रकरणी पुणे आर्थिक गुन्हे शाखेने जळगाव शहरात छापा टाकून याप्रकरणी विवेक ठाकरे, महावीर जैन, धरम साखंला, सुजीत वाणी, यांच्यासह कंडारेचा चालक कमलाकर भिकाजी कोळी यास अटक करण्यात आली. तर मुख्य संशयित जितेद्र कंडारे व सुनील झंवर फरार आहेत.

यापैकी अटकेतील विवेक ठाकरे, महावीर जैन, धरम सांखला, सुजीत वाणी, कंडारेचा चालक कमलाकर कोळी हे न्यायालयीन कोठडीत कारागृहात आहेत.

सुजीत वाणीचा गुन्ह्यात महत्वाचा ‘रोल’

संशयितां पैकी सुजीत वाणी याच्या जामीन अर्जावर मंगळवार, 5 जानेवारी रोजी कामकाज झाले. यात सरकार पक्षाचे अॅड. प्रवीण चव्हाण यांनी युक्तीवाद करतांना, सुजीत वाणी हा कंडारेचा खास माणूस होता,

तोच सर्व बीएचआरमध्ये झालेल्या व्यवहाराची इन्ट्री करत होता. कारवाईसाठी जेव्हा पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे आयुक्त आले.

त्यावेळी सुजीत वाणी हा त्याची कॅबिन बंद करुन पळून गेला होता. तसेच त्याने अधिकार्यांना बीएचआरचे रेकॉर्ड दिले नाही, असे सांगितले. त्याचा गुन्ह्यात

महत्वाचा सहभाग असल्याबाबत पुरावेही अॅड. चव्हाण यांनी न्यायालयासमोर सादर केले. दोन्ही पक्षाने युक्तीवाद केला असून जामीनावरील निकालासाठी 11 जानेवारी ही तारीख दिली आहे.

आज विवेक ठाकरेच्या जामीन अर्जावर कामकाज

इतर संशयित महावीर जैन, तसेच दलाल यांनीही जामीनासाठी अर्ज सादर केले आहेत. त्यापैकी विवेक ठाकरे याच्या अर्जावर उद्या 6 जानेवारी रोजी कामकाज आहे. तर इतरांच्या जामीन अर्जावर 11 जानेवारी, 12

द्यजानेवारी तसेच 15 जानेवारी रोजी कामकाज होणार आहे, असे सरकारपक्षाचे अॅड. प्रवीण चव्हाण यांनी बोलतांना सांगितले.