जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था घोटाळ्यातील संशयित आरोपींना पुणे न्यायालयात हजर करण्यात आले होते. पोलिसांनी पोलीस कोठडी वाढवून मिळण्याची मागणी केली असता, न्यायालयाने सी.ए.धरम सांखला, विवेक ठाकरे यांच्यासह पाच आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश आज दिलेत.

दरम्यान बीएचआर पतसंस्थेच्या घोटाळाप्रकरणी अवसायक जितेंद्र कंडारे, कृणाल शाह, प्रकाश वाणी, सुनील झंवर आदी आरोपी फरारच आहेत. दरम्यान अटकेतील आरोपी सी.ए.महावीर जैन, धरम सांखला, सुजीत वाणी, विवेक ठाकरे, अवसायक कंडारे याचा चालक कमलाकर कोळी अशा पाचा आरोपींना पुणे न्यायालयात आज हजर करण्यात आले होते.

पोलिसांनी संशयित आरोपींची 20 कारणे देवून पोलीस कोठडी मिळण्याची मागणी केली. न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकून पाचही आरोपींना न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.