बीएचआर पतसंस्था घोटाळा : सुरज झंवरचा जामीन अर्ज फेटाळला

बीएचआर पतसंस्था घोटाळा : सुरज झंवरचा जामीन अर्ज फेटाळला

पूणे आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरज विरोधात दोषारोपत्र केले आहे दाखल

जळगाव - Jalgaon :

बीएचआर घोटाळ्याप्रकरणी पुणे आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आलेल्या सुरज झंवर रा. जयनगर, जळगाव याने जामीनासाठी पुणे येथील न्यायालयात अर्ज केला होता.

त्यानुसार कामकाज पूर्ण होवून आज बुधवारी न्यायालयाने जामीनावर निकाल दिला. यात सुरज झंवरचा जामीनअर्ज फेटाळण्यात आला आहे.

पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेने बीएचआर पतसंस्थेच्या घोटाळ्याप्रकरणी सुरज झंवर यास अटक केली होती.

संशयित सुरज झंवर सद्यस्थितीत न्यायालयीन कोठडीत पुणे येथील कारागृहात आहे. पुणे आर्थिक गुन्हे शाखेने घेतलेले रिमांड हे बेकायदेशीर असल्याबाबत ते रद्द करण्यात यावे यासाठी सुरज झंवर याने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

सर्वोच्च न्यायालयाने तो अर्ज फेटाळून लावला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संशयित सुरज याने पुणे येथील न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल होता.

यात सरकारपक्षातर्फे ऍड. प्रवीण चव्हाण यांनी युक्तीवाद करतांना संशयित सुरज झंवर याचा गुन्हयात सक्रीय सहभाग आहे.

तसे पुरावेही आर्थिक गुन्हे शाखेने जप्त केले असल्याचे संागितले. व त्याच्या जामीनास विरोध केला.

दोन्ही बाजूच्या युक्तीवादाअंती पुणे न्यायालयाने आज निकाल देत आज बुधवारी संशयित सुरजचा जामीनअर्ज फेटाळून लावला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com