जळगाव - Jalgaon :

भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेत अवसायकाच्या काळात झालेल्या घोटाळ्याचा तपास सुरु असून काहींना अटक झालेली असली तरी मुख्य संशयित अवसायक कंडारेंसह व्यायसायिक सुनिल झंवर अद्यापही फरार आहेत.

त्यांचा शोध सुरु असतांनाच विविध पोलिस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेची पाच जणांची टीम आज सकाळी जळगावात दाखल झाली आहे.

गुन्ह्यांच्या कामात पथक काही जणांचे जाबजबाब नोंदविणार असल्याची माहिती मिळाली आहे.त्यांनंतर त्यात तथ्य आढळल्यास काहींना अटक देखील होवू शकते,त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे.

पुण्यातील आर्थिक गुन्हे शाखेचे पाच जणांच्या पथकात निरीक्षक दर्जाच्या अधिकार्यांचा समावेश आहे. हे पथक बीएचआर च्या गुन्ह्यांतील काही जणांचे जाबजबाब नोंदविणार असल्याची माहिती मिळाली आहे.

नेमकं किती दिवस हे पथक जळगावात थांबणार आहे हे मात्र अद्याप कळू शकलेले नाही. गुन्ह्याची इतरही कारवाई पूर्ण करणार असल्याचे सूत्रांकडून समजते. यात काही जणांना अटक होऊन त्यांना ही पथक सोबत घेऊन जाण्याची माहिती आहे.