बीएचआर पतसंस्था घोटाळा : राज्यभरात गुन्हे दाखल होण्यासाठी संघटनांची मोहीम

कंडारे व झंवर या दोघांच्या अटकेसाठीही सरकारवर दबाव आणणार
बीएचआर पतसंस्था घोटाळा : राज्यभरात गुन्हे दाखल होण्यासाठी संघटनांची मोहीम

जळगाव - Jalgaon :

बीएचआर या पतसंस्थेत गुंतवणूक करणाऱ्या ठेवीदारांचा मोठा विश्वासघात झालेला आहे याला जबाबदार असलेला अवसायक जितेंद्र कंडारे, विवेक ठाकरे व इतरांविरुद्ध राज्यभर गुन्हे दाखल व्हावेत यासाठी संघटनांनी मोहीम उघडली असून सोशल मीडियाद्वारे तसेच संपर्क करून राज्यभरातील ठिकठिकाणच्या गुंतवणूकदारांना आवाहन केले जात आहे.

यात पुण्यातून दामोदर दाभाडे, जळगावातून अशोक मंडोरे व गिरधर डाबी यांनी पुढाकार घेतलेला आहे. दरम्यान कंडारे व झंवर यांना अटक करण्यासाठी सरकारवर दबाव आणण्याचाही संघटनांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

पुण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर विवेक ठाकरे, महावीर जैन, सूरज झंवर यासह काही जणांना अटक झाली आहे तर या गुन्ह्यातील मुख्य संशयित तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारे, उद्योजक सुनील झंवर या दोघांना अद्याप अटक झालेली नाही.

ठेवीदारांना फसवविणारे सध्या जेलची हवा खात आहेत तर ज्यांनी ठेविदारांकडे जाऊन २५ ते ३० टक्के रक्कम देऊन अडचणीत सापडलेल्या ठेविदारांना फसविले आहे अशा सर्वांच्या नावाने जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रारी नोंदवाव्यात,कंडारे याने ठेविदारांच्या पावत्या २५ ते ३० टक्क्यात घेऊन त्या पावत्या १०० टक्के रकमेत कर्जदारांच्या कर्जात मॅचिंग करून ठेविदारांना फसविले आहे, अशा प्रकरणात जितेंद्र कंडारेच्या व ज्यांनी पैसे देऊन पावत्या घेऊन गेला त्यांच्या नावाने त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवावा. असे आवाहन संघटना प्रतिनिधींच्या वतीने गुंतवणूकदारांना केले जात आहे

ठेवी मिळवुन न देता ठेवीदारांकडूनच उकळले पैसे

कंडारे व विवेक ठाकरेने ठेविदारांच्या मुळ पावत्या घेऊन पैसेच दिले नाहीत मात्र विवेक ठाकरेने ठेविदारांकडून एक हजार रुपये सभासद फी आणि सात हजार रुपये लढा निधी घेऊन फसविले आहे.

त्याशिवाय ठेविदारांकडून ठेवीच्या एकूण रक्कमच्या ५ टक्के रोख रक्कम घेऊन कोरे बिअरर चेक घेऊन २० टक्के रक्कम परस्पर काढून घेण्यात यावी असे राजीपत्र म्हणजे स्वखुशीने १०० रुपयांच्या स्टँप पेपरवर लिहून घेतले आहे. म्हणून या दोघांच्या नावाने जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रारी कराव्यात, असे आवाहन

जळगाव जिल्ह्यातील ठेवीदारांना अशोक मंडोरे व गिरधर डाबी यांनी केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com