बीएचआर पतसंस्था घोटाळा : कंडारे, झंवर यांना अटकेसाठी खासदारांना साकडे

महाराष्ट्र राज्य ठेवीदार संघर्ष समितीचे निवेदन
बीएचआर पतसंस्था घोटाळा : कंडारे, झंवर यांना अटकेसाठी खासदारांना साकडे

जळगाव - Jalgaon :

बीएचआर फसवणूक व अपहार प्रकरणात अद्याप अटक न झालेले तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारे व उद्योजक सुनील झंवर यांना अटक करावी यासाठी महाराष्ट्र राज्य ठेवीदार संघर्ष समितीने निवेदनाव्दारे खासदार उन्मेष पाटील यांना साकडे घातले आहे. याबाबत समितीने खासदारांना व्हॉटस्ऍपव्दारे पोस्ट केली आहे.

समितीचे कार्याध्यक्ष अशोक मंडोरे व उपाध्यक्ष गिरधर डाभी यांनी उन्मेष पाटील यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की,

आपणांस दोन वेळा भेटून बीएचआरचा माजी अवसायक आरोपी जितेंद्र कंडारे विरोधात लेखी तक्रार केली होती तेव्हा आपण न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते.सहा महिन्यापूर्वी पुणे येथील पोलिसात गुन्हे दाखल झाले आहेत.

न्यायालयात दोषारोपपत्र सुद्धा दाखल झाले आहे, पण अजूनही दोघे संशयित आरोपी फरार असून त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज सुद्धा पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

कंडारे व झंवर स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर होणार नाहीत तरी आपण मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करावा अशी विनंती मंडोरे व डाभी यांनी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com