बीएचआर पतसंस्था घोटाळा : दोघांचा जामिन अर्ज फेटाळला

मुख्य सूत्रधार सुनिल झंवर यांचा पुन्हा जामिनासाठी अर्ज
बीएचआर पतसंस्था घोटाळा : दोघांचा जामिन अर्ज फेटाळला

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

बीएचआर घोटाळा प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या 11 संशयित आरोपींपैकी 9 संशयितांनी जामिनासाठी अर्ज दाखल केले होते. यातील जयश्री तोतला व जयश्री मणियार या दोघांच्या जामीन आर्जावर अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांनी जोरदार युक्तीवाद केल्याने न्यायालयाने त्या दोघांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

त्यामुळे इतर संशयीत आरोपीना देखील आता जामिन मिळणार की नाही याकडे आता लक्ष लागून आहे.

बीएचआर प्रकरणात राज्यभरात पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापेमारी करीत गुन्ह्याशी संबंधित असलेल्यांना अटक केली जात आहे. यात 17 जून रोजी जळगाव, भुसावळ, मुंबई, औरंगाबाद यासह धुळे येथील गुन्ह्याशी संबंधित असलेल्या 11 जणांना अटक केली होती.

अटकेत असलेल्या 11 पैकी अंबादास बाबाजी मानकापे (औरंगाबाद),जयश्री अंतिम तोतला (मुंबई), प्रेम नारायण कोकटा, भागवत भंगाळे (जळगाव), छगन झाल्टे (जामनेर), जितेंद्र रमेश पाटील (जामनेर), जयश्री मणियार (जळगाव), संजय तोतला (जळगाव), प्रितेश चंपालाल जैन (धुळे) या 9 संशयीत आरोपींनी जामिना अर्ज दाखल केले होते.

आजच सुनावणी घ्यावी यासाठी आग्रह

जयश्री तोतला व जयश्री मणियार यांचे वकील अ‍ॅड. आर. एफ. तोतला यांनी आमच्या जामीन अर्जावर आजच सुनावणी घेण्यात यावी असा आग्रह धरला होता. यावर सुनावणीदरम्यान सरकार पक्षाकडून अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांनी जोरदार युक्तिवाद करत जामीन फिट येण्याची मागणी केली त्यावर न्यायमूर्ती एस एस गोसावी यांनी संशयीत आरोपींवर गंभीर स्वरूपाचे आरोप असल्यामुळे जामीन देता येणार नाही असे निरीक्षण नोंदवीत त्यांचा जामीन फेटाळून लावला.

सुनिल झंवर यांचा पुन्हा जामिनासाठी अर्ज

युक्तीवादानंतर न्यायायीन कोठडीत असलेल्या दोघांचा जामीन अर्ज फेटाळून लावल्याने इतर संशयितांना जोरदार धक्का बसला आहे. तर दुसरीकडे मुख्य सूत्रधार सुनील झंवर याचा न्यायालाने अनेकवेळा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला असतांना देखील त्याने पुन्हा एकदा पुणे न्यायालयात अटकपूर्व जामिन अर्ज दाखल केला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com