बीएचआर पतसंस्था घोटाळा : संशयित सूरज झंवरला सुप्रीम कोर्टाचाही दणका

बीएचआर पतसंस्था घोटाळा : संशयित सूरज झंवरला सुप्रीम कोर्टाचाही दणका

याचिका फेटाळली ; नऊ दिवसांच्या पोलिस कोठडीला दिले होते आव्हान

जळगाव - Jalgaon :

बीएचआरपतसंस्थेच्या घोटाळ्यात मागील तीन महिन्यापासून अटकेतअसलेला संशयित सुरज सुनील झंवर रा. जयनगर, जळगाव याने नऊ दिवसांची पोलीस रिमांड बेकायदेशीर असल्याबाबत निकाल द्यावा, अशी याचिका आज बुधवारी सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे.

तसेच अर्जात तथ्य नसल्याचे सांगून योग्य त्या न्यायालयात दाद मागण्याचे आदेशही दिले आहेत. दरम्यान, सुरज झंवरचा जामीन अर्ज कोर्टाने याआधीच फेटाळून लावलेला आहे.

बीएचआर घोटाळ्यात मागील तीन महिन्यापासून सुरज सुनीलझंवर हा न्यायालयीन कोठडीत पुणे येथील कारागृहात आहे. संशयित सुरज झंवरने पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला नऊ दिवस ठेवलेल्या पोलीस कोठडीला बेकायदेशीर ठरवावे, अशी याचिका दाखल करुन पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या कारवाईला आव्हान दिले होते.

त्यावर आज सुप्रीम कोर्टात कामकाज झाले . यात सुरजकडून न्यायालयात ज्येष्ठविधिज्ञ मुकुल रोहतगी यांनी सुप्रीम कोर्टात युक्तिवाद केला.

परंतु सुप्रीम कोर्टाने सुरजच्या अर्जात तथ्य नसून या संबंधीसंपूर्ण तथ्य आमच्या समोर येत नाही तोपर्यंत याबाबत कुठलाहीनिकाल देऊ शकत नाही.

त्यामुळे अर्जदाराने योग्य त्या न्यायालयात जाऊन दाद मागावी, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले. एवढेच नव्हे, तर कोर्टाने जामीन अर्ज दाखल केल्यापासून एका आठवड्यात निकाल द्यावा, असेही आदेशात म्हटले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com