जन्मतारखेनुसार भविष्य...Future By Date Of Birth

18 ते 24 मार्च या आठवड्यात जन्मलेल्या व्यक्तींचे भविष्य
जन्मतारखेनुसार भविष्य..
जन्मतारखेनुसार भविष्य..Future By Date Of Birth

किरोच्या नजरेतून- सौ. वंदना अनिल दिवाणे

18 मार्च -

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर मंगळ, गुरु या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मीन आहे. निर्णय घेऊन खोलवर विचार करता कोणत्याही कार्याचे धडक कार्यक्रमात रुपांतर करण्याची तुम्हाला सवय आहे. मागून पश्चाताप करण्यापेक्षा अगोदरच एखाद्या तज्ञाचा सल्ला घेऊन मग कृती करणे फायद्याचे राहील. क्रोधी स्वभावामुळे अनेक गुप्त शत्रू निर्माण होण्याची शक्यता आहे. व्यापारी उलाढालीत भागिदारांची चांगली पारख करावी. तुमची महत्वाकांक्षा दांडगी राहील. अनेक प्रकारच्या अडचणींना धैर्याने तोंड देऊन तुम्ही अखेर आपले उद्दिष्ट गाठू शकाल.

19 मार्च -

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर सूर्य,हर्षल, गुरू या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मीन आहे. हर्षलच्या प्रभावाने अंतःस्फूर्तीची देणगी प्राप्त झाली आहे. स्वप्नांद्वारे किंवा अन्य मार्गाने पुढील घटनांची चाहूल लागेल. मिळालेल्या सूचनांचा उपयोग करून प्रगती करण्यासाठी उपयोग करा. आर्थिक आवक वाढविण्याच्या बाबतीत भाग्यवान आहात. उच्च जबाबदारीच्या पदावर नियुक्ती होण्याची संधी आहे.

20 मार्च -

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर चंद्र, नेपच्युन, गुरु या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मीन आहे. चंद्र आणि नेपच्युन यांच्या प्रभावामुळे तुमची कल्पनाशक्ती फार चांगली राहील. त्यातून तुम्हाला कलाक्षेत्रात विशेष यज्ञ मिळेल. मात्र त्यासाठी एक पथ्य पाळणे आवश्यक आहे. ते म्हणजे कला क्षेत्रातील एखादाच विषय घेऊन आयुष्यभर त्यात बदल न करता आपले लक्ष केंद्रीत करावे. स्वतःलाच स्वतःचे गुरु मानून कलासाधना केल्यास तुम्हाला यश मिळेल.

21 मार्च -

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर गुरु, रवि या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मीन आहे. गुरु ग्रहाच्या प्रभावामुळे बौद्धिक कार्य उरकण्याची इतकी प्रचंड शक्ती तुमच्याजवळ राहील की कितीही काम केले तरी त्या कामात तुम्हाला थकल्यासारखे वाटणार नाही. या एकाच कारणामुळे उद्योगाच्या कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला प्रचंड यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. भव्य आणि दिव्य गोष्टीचे तुम्हाला फार आकर्षण राहील.

22 मार्च -

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर हर्षल, मंगळ, गुरु या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मेष आहे. जीवनामध्ये तुम्हाला सुरुवातीच्या आयुष्यात नातेवाईक कुटुंबातील लोक आणि पत्नीच्या नातेवाईक यांच्याकडून बराच त्रास होण्याचा संभव आहे. तुमच्याकडून घेणारे बरेच लोक असले तरी तुम्हाला देणारा कुणीच नाही. त्यामुळे कुठल्याही प्रगतशील उद्योगात तुम्हाला स्वतःवरच अवलंबून रहावे लागेल. तुम्हाला दृष्टांत, स्वप्नसृष्टी किंवा त्याशिवाय पुढील घटनांची आधीच चाहूल लागेल.

23 मार्च -

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर बुध, गुरु, मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मेष आहे. तुम्हाला जीवनामध्ये उत्तम यश मिळू शकते. मात्र त्यासाठी जीवनाकडे बघण्याचा तुमचा दृष्टीकोन सकारात्मक असणे आवश्यक आहे. कुसंगती आणि कुविचार यापासून दूर राहणे तुमच्यासाठी फार आवश्यक आहे. तुमची बुद्धीमत्ता तीक्ष्ण असून त्याचा उपयोग धनप्राप्तीसाठी चांगला होईल. विशेषतः शेअर्स संबंधीत व्यवहारात तुम्हाला जास्त यश मिळेल. मात्र मिळालेले पैसे सांभाळणे खर्चाच्या वाढत्या प्रमाणामुळे शक्य होणार नाही.

24 मार्च -

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शुक्र, मंगळ, गुरु या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मेष आहे. तुमच्या ग्रहांची चौकट इतकी सबळ आहे की काही विशेष चूक झाली नाही तर जीवनात तुम्हाला सहज यश मिळेल. तुम्हाला सौंदर्याचे फार वेड असल्याने संगीत, पेंटींग, काव्य, साहित्य इ. कलांबद्दल फार आकर्षण वाटेल. तुमचा स्वभाव भावनाप्रधान असल्याने गरीब व दुःखी व्यक्तींबद्दल अतिशय सहानुभूती वाटल्याने स्वतःची झीज सोसून तुम्ही त्या व्यक्तीला मदत कराल. अनपेक्षित मार्गाने धनप्राप्ती होईल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com