पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले
पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले
जळगाव

शहराची शांतता भंग करणाऱ्याचे रेकॉर्ड तयार करणे सुरु

रावेरात दंगेखोरांवर कारवाईसाठी पोलीस लक्ष ठेवून - डॉ पंजाबराव उगले

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

रावेर - Raver - प्रतिनिधी :

दंगलीने रावेर अतिसंवेदनशील शहर बनले आहे.नुकताच जामिनावर सुटून आलेल्या दंगलीतील हिरोंचा सत्कार झाला.त्या हिरोंचा झिरो करण्याचा प्लॅन पोलीस प्रशासनाने आखला आहे .तीन दंगलीचा अभ्यास पोलीस प्रशासनाने केला आहे.यात राज्यात पहिल्यांदा दंगे झालेल्या परिसरातून नुकसान भरपाई वसूल करण्याची प्रक्रिया रावेरपासून सुरु केली आहे.

शहराची शांतता भंग करणाऱ्याकडे पोलीस प्रशासनाचे लक्ष आहे.बकरी ईद सार्वजनिक स्वरुपात साजरी न करता,प्रतिकात्मक स्वरुपात कुर्बानी देऊन साजरी करावी असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी रावेर येथे शांतता समितीच्या बैठकीत बोलतांना व्यक्त केले.

पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले पुढे म्हणाले की कोरोना असे पर्यन्त सकारात्मक सण उत्सव साजरे करावे.गुरांच्या वाहतुकीबाबत कायद्याचे उल्लंघन करून कायदा हातात घेऊ नये.चार महिन्यापूर्वी रावेर शहरात दंगल झाली.यामुळे शहरातील नागरिकांना त्रास झाला. शहरातील दंगलीची मनोकृती बदलली पाहिजे.पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक यांनी दंगलीच्या दिवशी दंगल चांगल्या पद्धतीने हाताळून एक मोठा अनर्थ टळला.याबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले.

पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके म्हणाल्या की, दंगलीच्या दिवशी काही नागरिकांनी दंगल शांत करण्यासाठी प्रयत्न केले ही चांगली बाब आहे. मात्र येथे वारंवार घडणाऱ्या दंगलीमुळे शहरातील मुलांचे भवितव्य अंधारात आले आहे.पुढच्या पिढीला आपण काय देणार आहोत? याचा विचार करा.चांगली विचारसरणी पुढे येण्याची गरज आहे.पोलीस प्रशासन यापुढे ढिलाई दाखवणार नाही. यामुळे शहरात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये शांतता राखावी असे आवाहन करत,शांतता बिघडवत असलेल्या लोकांचे पोलीस रेकॉर्ड करत आहे.

शहर सेन्सिटिव्ह असल्याने पोलिसांची नजर शहरावर कायम राहणार आहे.त्यामुळे जे-जे चुकीचे करत आहे.त्यांचे भविष्य खराब असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.यावेळी प्रास्ताविक पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी मांडले.मौलाना गयासुद्दिन यांनी बकरी ईद बाबत माहिती दिली.

प्रांत अधिकारी डॉ अजित थोरबोले यांनी मनोगतातून जिल्ह्यात कोरोनाचा मृत्यूदर 4.8 असतांना,रावेर-यावल मध्ये हा 7.5 पर्यंत आला आहे.लग्नकार्य आणि अंत्ययात्रेत जास्तीत जास्त लोक सहभागी होतात.यामुळे अधिक धोका आहे.सण उत्सव साध्या पद्धतीने साजरे करावेत.पार्ट्या करू नये असे मार्गदर्शन त्यांनी केले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com