खबरदार अन्यथा तुमचेही वाहन होईल जमा

दाणा बाजारात वाहनांवर कारवाई
खबरदार अन्यथा तुमचेही वाहन होईल जमा

जळगाव। Jalgaon

करोनाच्या काळात सामूहिक गर्दी होणाऱ्या ठिकाणी वाहनांना बंदी घालण्यात आलेली असताना जळगावची मुख्य बाजारपेठ असलेल्या दाणा बाजारात दररोज मोठ्या प्रमाणात वाहने येत असतात यामुळे या भागात अक्षरशः पायी चालायलाही जागा नसते हे लक्षात घेऊन महापालिका व वाहतूक शाखेने वाहने जप्तीची कारवाई सुरू केली आहे.

शुक्रवारी सकाळपासूनच सुरू झालेल्या या कारवाईत 100 पेक्षा अधिक वाहने जमा करण्यात आली. दाणा बाजारात खरेदीसाठी जात असाल तर वाहने नेऊ नका अन्यथा आपलेही वाहन जमा होईल असे आवाहनच प्रशासनाने केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com