रावेरमध्ये केळी भावात घसरण

मात्र अवघ्या 20 किलोमीटर असलेल्या बर्‍हाणपूरात वाढ
रावेरमध्ये केळी भावात घसरण

रावेर - Raver - प्रतिनिधी :

रावेर बाजार समितीने शुक्रवारी केली भावात 20 रुपयांनी घसरण केली,मात्र शेजारी अवघ्या 25 किलोमीटर असलेल्या बर्‍हाणपूर बाजार समितीत भावात वाढ झाली.एकीकडे भाव वाढ होत असताना,रावेरात मात्र भावात घसरण सूर आहे.नेमके गौडबंगाल काय? असा सवाल केळी उत्पादक बाजार समितीला विचारात आहे.

परिस्थिती मालाची आवक पाहून भावात चढ उतार केले जातात.बर्‍हाणपूर मार्केटमध्ये एका दिवसात 100 रुपयांनी देखील भाव तुटतात,मग तेव्हा आपण त्यानुसार भाव कमी करत नाही.शेतकरी आणि व्यापारी दोन बाजू आहे,त्यामुळे एकदा या दोन्हीचे समाधान होत नाही.बर्‍हाणपूरमध्ये आज फक्त 7 रुपये वाढ झाली आहे.या आधी तिथे देखील मोठी घसरण दि.30 जून रोजी झाली होती.बाजार समितीने काढलेले भाव योग्य आहे.

रामदास पाटील,अध्यक्ष केळी भाव समिती,बाजार समिती रावेर

शुक्रवारी रावेर बाजार समितीच्या केळी भाव समितीने नवती 1195,पिलबाग 1105,वापसी 795 भाव जाहीर केले.गुरुवारच्या भावात 20 रुपये घसरण झाली आहे.बाजार समितीने काढलेल्या भावावर शेतकर्याकडून आक्षेप घेतला जात आहे.

अवघ्या 25 किलोमीटर अंतरावरील बर्‍हाणपूर मार्केटमध्ये तेजी आहे.एका दिवसात भावात अल्पशी वाढ झाली आहे.मात्र रावेरात गेल्या 10 दिवसात 50 रुपयांनी भाव घसरण झाली आहे.

रावेर तालुक्यातील केळी व्यापारी बाजार समितीच्या बोर्ड भावावर लक्ष ठेवून,त्यानुसार किती रुपये कमी करून केळी खरेदी करावी,याचा अंदाज लावून शेतकर्यांना भावापेक्षा कमीने मागणी केली जाते.हि वस्तुस्थिती आहे,मात्र याबाबत शेतकरी देखील तक्रार करायला धजावत नसल्याने,सर्व आलबेल आहे.गेल्या महिन्यात केळी पट्ट्यात वादळाने केळी बागा भुईसपाट झाल्या,आता आहे त्या मालाला योग्य भावाची अपेक्षा असतांना,भावांच्या या चढ-उताराने शेतकर्‍यांची मानसिकता खराब होत आहे.

पातोंडी येथील शेतकरी लखन सावळे यांनी शुक्रवारी काढलेल्या भावावर आक्षेप घेतला आहे.10 दिवसात 50 रुपयांनी घसरण झाली,मात्र शेजारील बर्‍हाणपूर मध्ये वाढ झाल्याची पर्ची त्यांनी दाखवली.

केळी भाव समिती अध्यक्षांचा राजीनामा ?

रावेर बाजार समितीच्या अधिपत्याखाली असलेल्या केळी भाव समितीचे अध्यक्ष रामदास पाटील यांनी त्यांचा पदाचा राजीनामा बाजार समितीकडे सोपवला आहे.त्यांनी अचानक राजीनामा सादर केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

गेल्या पाच वर्षापासून रामदास पाटील व त्यांचे सहकारी बाजार समितीच्या माध्यमातून केळी भाव काढत आहे.अतिशय पारदर्शी आणि शेतकर्याना न्याय देण्याची त्यांची मोठी भूमिका बजावत आहे.अचानक त्यांनी राजीनामा दिला असल्याने,केळी उत्पादकांमध्ये खळबळ उडाली आहे.

दोन महिन्यापूर्वी राजीनामा दिल्याचे देशदूतशी बोलतांना सांगितले,मात्र अद्याप त्यांच्या राजीनाम्याला संचालक मंडळाकडून मंजुरी मिळालेली नसून,संचालक मंडळाच्या आग्रहाने त्यांना वर्षभर मुदतवाढ देण्यात आल्याची प्रतिक्रिया सभापती गोपाळ नेमाडे यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com