वादळाचा फटका : यावल तालुक्यात केळी भुईसपाट

महसूल प्रशासनाने त्वरीत पंचनामे करण्याची मागणी
केळी पिकाचे झालेले नुकसान
केळी पिकाचे झालेले नुकसान

यावल - अरुण पाटील Yaval

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात दि.१८ रोजी संध्याकाळी आलेल्या अचानक वादळी पावसामुळे पिळोदा खुर्दु, थोरगव्हाण तापी नदी काठावरील या गावांच्या शेत शिवारामध्ये शेतकऱ्यांचे केळीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून केळीचे पिक भुईसपाट झाले आहे.

महसूल प्रशासनाने यांचे त्वरीत पंचनामे करावे व शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे

काल झालेल्या पावसामध्ये थोरगव्हाण शिवारातील धनसिंग बाबुराव सोनवणे यांच्या शेतात मनवेल येथील राजेंद्र पाटील यांनी स्वामित्वने शेत केलेले होते त्यात सहा हजार केळीचे खोड 24 ते 25 चे रासची केळी वादळात जमीनदोस्त झाली तर पिळोदा शिवारातील येथील रहिवासी विनोद प्रताप पाटील, संतोष गोकुळ पाटील, कांतीलाल पाटील साहेबराव दत्तात्रय पाटील, यांची शेतातील केळी जमीनदोस्त झाली याच बरोबर शिवारामध्ये कापूस मका ज्वारी अनेकांच्या उन्मळून पडल्या काल झालेल्या अचानक वादळामुळे व रात्री उशिरा यावल शेतशिवारात अचानक आलेल्या पावसामुळे सुद्धा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून अगोदर कोरोनाचा फटका आणि आता अवकाळी पाऊस यामुळे शेतकरी चहुबाजूने वेढला गेला.

याबाबत शेतकऱ्यांना पाठीशी आता सरकार मुदतीसाठी उभी राहील का? का पंचनामे करून फक्त कोरे कागद काळे होतील? असा प्रश्न उपस्थित होत आहे

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com