बीएएमएस कंत्राटी अधिकारी शिष्टमंडळाची जलसंपदा मंत्र्यांशी भेट

बीएएमएस कंत्राटी अधिकारी शिष्टमंडळाची जलसंपदा मंत्र्यांशी भेट

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

राज्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत बी.ए.एम.एस. गट-अ. कंत्राटी वैद्यकीय अधिकार्‍यांना कार्यमुक्त करण्यात येऊ नये व कार्यमुक्त झालेल्या वैद्यकीय अधिकार्‍यांना परत सेवेत सामावुन घेण्यासंदर्भात माजीमंत्री एकनाथराव खडसे, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अ‍ॅड.रोहिणी खडसे-खेवलकर यांच्या नेतृत्वाखाली निमा-कॉन्ट्रैक्चुअल मेडीकल ऑफीसर फोरमचे राज्याध्यक्ष डॉ.अभिषेक ठाकुर व संघटनेच्या शिष्टमंडळाने जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन निवेदन दिले.

यावेळी खडसे यांनी या कंत्राटी वैद्यकीय अधिकार्‍यांनी आपल्याला कोरोना काळात सेवा दिलेली आहे. त्यांच्यावर होणारा अन्याय दूर करावा व कॅबिनेट बैठकीत याविषयी चर्चा व्हावी, अशी मागणी जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्याकडे केली.

ना.जयंतराव पाटील यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलतो व कॅबिनेटमध्ये हा विषय चर्चेला घेण्यास सांगतो,असे आश्वासन दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जळगावचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील, जिल्हा सरचिटणीस अशोक पाटील, कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे जिल्हा सचिव मिलिंद लोणारी, पांडुरंग नाफडे आदी उपस्थित होते.

राज्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत बी.ए.एम.एस. गट-अ.कंत्राटी वैद्यकीय अधिकार्‍यांना कार्यमुक्त करण्यात येऊ नये व कार्यमुक्त झालेल्या वैद्यकीय अधिकार्‍यांना परत सेवेत सामावुन घेण्यासंदर्भात अ‍ॅड.रोहिणी खडसे-खेवलकर यांच्या नेतृत्वाखाली निमा-कॉन्ट्रैक्चुअल मेडीकल ऑफीसर फोरमचे राज्याध्यक्ष डॉ.अभिषेक ठाकुर व संघटनेच्या शिष्टमंडळाने आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे यांची भेट घेऊन निवेदन दिले.

यावेळी अ‍ॅड. रोहिणी खडसे-खेवलकर यांनी कंत्राटी वैद्यकीय अधिकार्‍यांनी आपल्याला कोरोना काळात सेवा दिलेली आहे, त्यांना कार्यमुक्त करण्यात येऊ नये व त्यांच्यावर होणारा अन्याय दुर करावा, अशी मागणी ना.राजेश टोपे यांना केली. त्यानुसार ना.टोपे यांनी निवेदनाचा पुर्णपणे अभ्यास करुन ब्रीफींग करावे व पुढील कार्यवाही संदर्भात संबंधितांना अवगत करावे, असे सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com