जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

स्वर्गीय वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आयोजित एकोणिसाव्या बालगंधर्व संगीत महोत्सवाला शुक्रवारी छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात प्रारंभ झाला.

कार्यक्रमाच्या दुसर्या दिवसाची प्रथम सत्राची सुरुवात ओमकार दादरकर यांच्या शास्त्रीय उपशास्त्रीय गायनाने झाली.

प्रथम राग शाम कल्याणमधील विलंबित रूपक तालातील म्हारा रसिया बंदिश सादर केली. त्यानंतर सावन की सांज ही मध्य लय तीन तालातील बंदिश सादर केली. त्यानंतर बेला सांजकी ही द्रुत एक तालातील बंदिश सादर केली.

त्यानंतर कै. विदुषी गिरिजा देवी यांची स्वर रचना असलेली तुम बिन नींद ना ही मिश्र किरवाणी रागातील ठुमरी सादर केली, त्या नंतर नामदेव महाराजांचे शब्द आणि पं. श्रीनिवास खळे यांची स्वर रचना असलेला काळ देहासी हा अभंग सादर केला.

प्रथम सत्राची सांगता करताना बालगंधर्वांनी अजरामर केलेले आणि संत चोखामेळा यांची शब्द रचना असलेले जोहार मायबाप जोहार हे पद गाऊन केली.