<p><strong>भुसावळ प्रतिनिधी bhusawal</strong></p><p>पिस्तूलचा धाक दाखवत येथील रेल्वे स्थानकाबाहेरील पार्किंग मध्ये काम करणाऱ्या तरुणास मारहाण करून दर महिन्याला पाच हजार रुपये खंडणी पोटी हप्ता देण्याची मागणी केल्याप्रकरणी आरोपी हंसराज खरात व आरोपी अमोल उर्फ चिन्ना श्याम खिलारे यांना भुसावळ प्रथम वर्ग १ न्यायाधीश पी. व्ही. चिद्रे यांनी प्रत्येकी 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. </p>.<p>तसेच दोषारोप पत्र दाखल होईपर्यंत प्रत्येक सोमवार बाजारपेठ पोलिस स्टेशनला हजेरी लावणे या अटी शर्तींवर जामीन मंजूर केला आहे आरोपीतर्फे ॲड सत्यनारायण पाल तर सरकार तर्फे सरकारी वकील भागवत पाटील यांनी काम पाहिले तपास एपीआय अनिल मोरे करीत आहे</p>