बहिणाबाई विद्यापीठ ३१ ऑगस्टपर्यंत बंदच
जळगाव

बहिणाबाई विद्यापीठ ३१ ऑगस्टपर्यंत बंदच

विद्यापीठ परीसर, संलग्नित महाविद्यालयांचा समावेश

Pankaj Pachpol

जळगाव - Jalgaon

करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने टाळेबंदीचा कालावधी वाढविल्यामुळे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परीसर, संलग्नित महाविद्यालये व परिसंस्था येत्या दि.३१ ऑगस्ट पर्यंत बंद राहणार आहेत. मात्र विद्यापीठ व महाविद्यालयात मर्यादित कर्मचारी दैनंदिन कामासाठी आळीपाळीने उपस्थित राहतील.

याकाळात सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी मुख्यालय न सोडता घरी बसूनच आवश्यक असेल ती कार्यालयीन कामे करावीत, असे निर्देश देण्यात आले आहेत. प्रभारी कुलसचिव प्रा.बी.व्ही.पवार यांनी शुक्रवार दि.३१ जुलै रोजी परीपत्रक निर्गमित केले असून त्यामध्ये ३१ ऑगस्ट पर्यंत राज्य शासनाच्या निर्देशानुसार टाळेबंदीचा कालावधी वाढविला असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com