बी पॉझिटिव्ह रुग्णाला ए.बी पॉझिटिव्ह रक्तगटाचा दिला जात होता प्लाझ्मा

जिल्हा रुग्णालयातील कारभाराचे निघाले धिंडवडे
बी पॉझिटिव्ह रुग्णाला ए.बी पॉझिटिव्ह रक्तगटाचा दिला जात होता प्लाझ्मा

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

शासकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालय अनेक वेगवेगळ्या घटनांनी नेहमी चर्चेत असते. आता या महाविद्यालयात एका बी पॉझिटीव्ह रक्तगट असलेल्या करोनाबाधित रुग्णाला उपचारादरम्यान ए.बी पॉझिटीव्ह रक्तगटाचा प्लाज्मा दिला जात असल्याचा धक्कादायक प्रकार आज सोमवारी दुपारी समोर आला आहे.

या गंभीर प्रकाराची माहिती मिळाल्यावर उपमहापौर कुलभुषण पाटील यांनी प्रसंगाधान राखत तत्काळ शासकीय महाविद्यालय गाठल्याने अनर्थ टळला आहे.

शहरातील शासकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालयात करोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत.

यात ठिकाणी बी पॉझिटीव्ह रक्तगट असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना प्लाज्माची आवशकता होती. मात्र या रुग्णाला बी पॉझिटीव्ह प्लाज्मा देणे आवश्यक असतांना त्याला ए.बी.पॉझिटीव्ह गटाला प्लाज्मा दिला जात होता.

याप्रकाराची माहिती उपमहापौर कुलभुषण पाटील यांना मिळाल्यावर त्यांनी तत्काळ शासकीय महाविद्यालय गाठले. तसेच रुग्णाला चुकीच्या गटाचा प्लाज्मा देण्याचा हा प्रकार रोखला. तसेच संबंधित प्रकाराबाबत रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला.

शासकीय महाविद्यालयातील टेक्निशिअनच्या प्रकारामुळे हा प्रकार घडल्याचे शासकीय महाविद्यालयातील उपअधीष्ठाता डॉ. दिलीप पोटे यांनी मान्य करत त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन महापौरांना दिले.

दरम्यान या प्रकारामुळे शासकीय महाविद्यालयातील कारभाराचे धिंडवडे निघाले आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com