जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

करोनाच्या संक्रमणामुळे पाचवी ते आठवीसाठी शासनाचे कालपर्यंत कुठलेच आदेश नसतांनाजवळ जवळ सर्व शाळांमध्ये त्या शिक्षकांना शंभर टक्के उपस्थितीची सक्ती केली जात आहे.

कोरोना कारणास्तव खुद्द महसूल विभाग, शिक्षण विभाग सुद्धा पाच दिवसांचा आठवडा म्हणूनच काम करीत आहे.

अश्यावेळी शिक्षणाधिकार्यांनी स्थानिक पातळीवर तसे स्पष्ट आदेश काढून शाळा प्रशासनाला ते निर्गमित करावे, असे निवेदन भाजप शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रवीण जाधव यांनी माध्यमिक शिक्षणाधिकार्यांना दिले.

राज्यशासनाच्या आदेशानुसार योग्य काळजी घेवून जिल्ह्यातील नववी ते बारावी शाळा सुरु केल्या त्याचे स्वागतच.पण त्या खालील वर्गाला आदेश नाहीत. मग त्यांना सक्तीने उपस्थिती का? शाळा सकाळ शिफ्ट व दुपार शिफ्ट अश्या असतात.

काही ठिकाणी सकाळी इयत्ता 5 वी ते 8 वी वर्ग असतात.ते वर्गच शासनाच्या आदेशानुसार भरत नाही. तरी सुद्धा शाळा प्रशासन सर्वांना सक्ती करून वेठीस का धरतात.

50टक्के कर्मचारी उपस्थिती म्हणून आपण तसे आदेश करावे, अशी अपेक्षा संबंधित शिक्षकांकडून होत आहे. प्रत्यक्षात ऑनलाईन ते वर्ग सुरु आहेतच. शिक्षकांचे सुद्धा काम सुरु आहे. इतर जिल्ह्यात शिक्षणाधिकार्यांनी संबंधित शिक्षकांना बोलवल्यास कायदेशीर कार्यवाहिला सामोरे जाल असे स्पष्ट आदेश शाळांना काढले आहेत.

अश्याच पद्धतीचा न्याय त्वरित जळगाव जिल्ह्याला सुद्धा व्हावा.असे निवेदन भाजप शिक्षक आघाडीने शिक्षणाधिकार्यांना दिले आहे.