<p><strong>जळगाव - Jalgaon</strong></p><p>शहरातील तालुका पोलिस स्टेशनजवळ असलेल्या खदाणीत एका महिलेने शनिवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला.</p>.<p>परिसरातील नागरिकांसह पोलीस कर्मचारी तसेच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून तब्बल दोन तासानंतर महिलेचे प्राण वाचवले आहे. जयश्री रविंद्र पाटील (वय ३९ रा.) आव्हाणे रोड, सुदत्त कॉलनीत असे महिलेचे नाव आहे.</p>