जिल्हा कारागृहात बॅरेकमध्ये महिला कैदीचा आत्महत्येचा प्रयत्न
USER

जिल्हा कारागृहात बॅरेकमध्ये महिला कैदीचा आत्महत्येचा प्रयत्न

जळगावातील घटना, जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल

जळगाव- Jalgaon

जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयित अनिता राजा चावरे वय ५० या महिलेेने जिल्हा कारागृहातील बॅरेक क्रमांक २ मध्ये पंख्याला गळफास घेवून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास घडली. अल्पवयीन मुलीला पळवून तिच्यासोबत बनावट कागदपत्रांच्या आधारे लग्न केले तसेच तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात दाखल गुन्हयात अनिता चावरे या न्यायालयीन कोठडीत आहेत.

कारागृहातील बॅरेक क्रमांक २ मध्ये न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयित अनिता चावरे यांनी साडीचा पदरचा काठ कापून बॅरेकमधील पंख्याला गळफास घेण्याचा प्रयत्न केला. वेळीच प्रकार लक्षात आल्याने दुर्घटना टळली. याप्रकरणी जिल्हा कारागृहातील महिला रक्षक उषा मुरलीधर भोम्बे यांच्या फिर्यादीवरुन जिल्हापेठ पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी अनिता चावरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान आत्महत्येचा प्रयत्न का केला त्याचे कारण कळू शकलेले नाही. घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार पुरूषोत्तम वागळे हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com